6 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केलेले भाजप नेते बृजभूषण शरण सिंहंची निर्दोष मुक्तता
महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर चर्चेत आलेले भाजप नेते आणि माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांना दिल्लीतील न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पोक्सो प्रकरणात पुरावे नसल्याने त्यांच्याविरोधातील कार्यवाही संपुष्टात आली आहे.
महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर चर्चेत आलेले भाजप नेते आणि माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांना दिल्लीतील न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पोक्सो प्रकरणात पुरावे नसल्याने त्यांच्याविरोधातील कार्यवाही संपुष्टात आली आहे.
दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने पोलिसांनी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. त्यामुळे बृजभूषण सिंह यांच्यावरील पोक्सोची कार्यवाही संपली आहे. महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत जंतरमंतरवर आंदोलन केले होते. मात्र, बृजभूषण सिंह यांनी सुरुवातीपासूनच हे आरोप फेटाळले होते.
न्यायालयाच्या निर्णयानंतर बृजभूषण सिंह यांनी समाधान व्यक्त केले. “मी जे आधीच बोललो होतो ते आता खरं होत आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या प्रकरणातील आरोप सिद्ध झाल्यास फासावर लटकेल, असेही त्यांनी यापूर्वी म्हटले होते.
दरम्यान, त्यांच्या वकिलांनी तक्रार आणि तक्रारदाराच्या साक्षीत तफावत असल्याचे आधीपासून सांगितले होते. “आम्ही कोर्टाच्या आदेशाची वाट पाहत आहोत,” असे वकिलांनी स्पष्ट केले. आदेशानंतर सविस्तर प्रतिक्रिया देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Published on: Aug 03, 2026 12:44 PM
महिला कुस्तीपटू प्रकरणात बृजभूषण सिंह यांना मोठा दिलासा; 6 गंभीर...
भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा...
न माथेरान न महाबळेश्वर, महाराष्ट्रातील या पर्यटनस्थळी एका दिवसाला...
मधमाशांनी हल्ला करताच डेडबॉडी सोडून सर्वच पळाले; व्हिडीओ व्हायरल

