हे काय नवीन? अमित शाहांचा राजीनामा मागण्यासाठी संजय राऊतांची नवी शक्कल, थेट संसदेत…
संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अनुपस्थितीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मागील 2 आठवड्यांपासून पंतप्रधान आणि गृहमंत्री संसदेत दिसत नसल्याचा दावा राऊत यांनी केला.
संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अनुपस्थितीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मागील 2 आठवड्यांपासून पंतप्रधान आणि गृहमंत्री संसदेत दिसत नसल्याचा दावा राऊत यांनी केला. कोट्यवधी रुपये खर्च करून नवी संसद उभारली, मग संसद इन्स्टाग्रामवरच चालवा, असा टोला त्यांनी लगावला. तसेच संसदेला सामोरे जाण्यास घाबरणाऱ्या पंतप्रधानांना पदावर राहण्याचा अधिकार आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी पुढेही सुरू ठेवणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “आज आम्ही त्यांना पुन्हा बोलावण्याचा प्रयत्न करू आणि अमित शहांचा राजीनामा मागण्याचा आमचा उपक्रम, ती मागणी चालूच राहील. आम्ही थेट संसदेतच आंदोलन करणार आणी राजीनाम्याची मागणी करणार” पुण्यात अमित शाह यांच्या विरोधात निदर्शने झाल्याचा उल्लेख करत राऊत यांनी सरकारला जनतेसमोर येण्याचे आव्हान दिले.
राऊत म्हणाले, “जनतेला सामोरं जा ना.. जनतेल तुम्ही सामोरं का जात नाही.” पुढे त्यांनी निवडणुकीतील कथित गैरप्रकारांवरही भाष्य केले. “जर तुम्ही चोऱ्यामाऱ्या करून, लफंगेगिरी करून, व्होटचोरी करून, दहशतीच्या मार्गाने निवडून आले असाल तर ती दहशत तुम्हाला छळते,” अशी टीका त्यांनी केली.
Published on: Aug 03, 2026 11:11 AM
हे काय नवीन? अमित शाहांचा राजीनामा मागण्यासाठी संजय राऊतांची नवी शक्कल
जे पंतप्रधान देशाच्या संसेदला सामोरं जायला टरकतात त्यांना...
भाजपच्या मित्रपक्षाचाच भाजपला घरचा आहेर! नेमका मसला काय?
मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातवरील मोठी अपडेट समोर

