जे पंतप्रधान देशाच्या संसेदला सामोरं जायला टरकतात त्यांना… संजय राऊतांचा मोदींवर थेट प्रहार
संसदेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अनुपस्थितीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे संसदेत दर्शन झाले नसल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले.
संसदेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अनुपस्थितीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे संसदेत दर्शन झाले नसल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “गेल्या दोन आठवड्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह संसदेत उपस्थित नाहीत. मग एवढे कोट्यवधी रुपये खर्च करून नवी संसद उभारण्याची गरज काय होती? संसद इन्स्टाग्राम किंवा सोशल मीडियावरच चालवायची होती का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राऊत यांनी पुढे म्हटले की, देशाच्या संसदेला सामोरे जाण्यास जर पंतप्रधान आणि गृहमंत्री तयार नसतील, तर त्यांना त्या पदांवर राहण्याचा नैतिक अधिकार आहे का, याचा विचार झाला पाहिजे. संसद ही लोकशाहीची सर्वोच्च संस्था असून, सरकारने संसदेसमोर उत्तरदायी राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी संजय राऊत यांनी विरोधकांकडून “गुमशुदा की तलाश” या स्वरूपात आंदोलन करण्याचाही इशारा दिला. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी संसदेत उपस्थित राहून विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संजय राऊत यांनी सरकारवर लोकांपासून दूर राहण्याचाही आरोप केला. लोकांनी निवडून दिले असल्यास जनतेसमोर जाण्याची तयारी दाखवावी, असे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यांच्या या वक्तव्यामुळे संसदेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Aug 03, 2026 11:04 AM
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..

