AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बालेकिल्ल्यातच भाजपला दुसऱ्या क्रमांकावर आणणारा नेता कोण? गेल्या 30 वर्षांपासून...  बिहार पोटनिवडणूकीत सर्वात मोठा उलटफेर?

बालेकिल्ल्यातच भाजपला दुसऱ्या क्रमांकावर आणणारा नेता कोण? गेल्या 30 वर्षांपासून… बिहार पोटनिवडणूकीत सर्वात मोठा उलटफेर?

| Updated on: Aug 03, 2026 | 1:36 PM
Share

पाटणा येथील बांकीपूर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. ए.एन. कॉलेजमध्ये सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली. आधी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली असून आता ईव्हीएम मतांची मोजणी सुरू आहे.

पाटणा येथील बांकीपूर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. ए.एन. कॉलेजमध्ये सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली. आधी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली असून आता ईव्हीएम मतांची मोजणी सुरू आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्पातच यामध्ये मोठा उलटफेर दिसत आहे.

कलांनुसार पहिल्या फेरीनंतर जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर 862 मतांनी आघाडीवर आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही जागा भाजपचा बालेकिल्ला मानली जाते याच ठिकाणी गेल्या ३० वर्षांपासून भाजपचा विजय होत असल्याचं सांगितलं जात. अशात आता भाजपचे नीरज सिन्हा 1,363 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आरजेडीच्या रेखा गुप्ता यांना दोन फेऱ्यांमध्ये 505 मते मिळाली आहेत. या निवडणुकीत एकूण 25 उमेदवार रिंगणात आहेत.

मतमोजणीसाठी केंद्रावर कडक सुरक्षा तैनात असून ड्रोनद्वारेही लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान,
बांकीपूरमध्ये 1995 पासून भाजपचा सलग विजय होत आला आहे. नितीन नवीन यांना नवी जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी विधानसभेचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.

Published on: Aug 03, 2026 01:36 PM

Follow Us