युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी!

| Updated on: Sep 15, 2022 | 9:41 AM

जसं हे युद्ध सुरु झालं, विद्यार्थ्यांना मायदेशी परतावं लागलं. युद्ध काही थांबलेलं नाही. विद्यार्थ्यांपुढे भविष्याची चिंता आहे. विद्यार्थ्यांवर प्रचंड दडपण आहे.

युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी!
Ukraine Medical Students
Follow us on

युक्रेन आणि रशियामध्ये (Ukraine Russia) फेब्रुवारीपासून युद्ध सुरु आहे. युद्धाचा फटका जनसामान्यांना जास्त बसतो. विद्यार्थ्यांना सुद्धा याचा चांगलाच फटका बसलाय. भारतातून जवळपास 20 हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये मेडिकलचं शिक्षण (Medical Education) घेत होते. जसं हे युद्ध सुरु झालं, विद्यार्थ्यांना मायदेशी परतावं लागलं. युद्ध काही थांबलेलं नाही. विद्यार्थ्यांपुढे भविष्याची चिंता आहे. विद्यार्थ्यांवर प्रचंड दडपण आहे. अशातच आता रशियातील अनेक विद्यापीठे (Russian Universities) आता विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करण्यासाठी पुढे आली आहेत. यासंदर्भातलं वृत्त इंडिया टुडेने दिलंय.

रशिया युक्रेनमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना देशात शिक्षण घेण्याची परवानगी देईल, असे रशियन दूतावासातील डेप्युटी चीफ ऑफ मिशन रोमन बाबुश्किन यांनी जूनमध्ये सांगितले होते. आता याची अंमलबजावणी होणारे.

युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी रशियन विद्यापीठे प्रवेश देत आहेत, असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

दिल्लीत ‘रशियन एज्युकेशन फेअर 2022’ला सुरुवात झालीये. रशियन हाऊसने युक्रेनमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना समुपदेशन देण्यासाठी हेल्प डेस्क स्थापित केलंय.

युक्रेनमध्ये शिकणाऱ्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी रशियन विद्यापीठे आणि त्यांच्या प्रतिनिधींनी नवी दिल्लीतील रशियन हाऊसमध्ये हेल्प डेस्क सुरू केले आहे.

जी विद्यापीठं भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रवेश देणार आहेत ती त्यांना शिक्षण शुल्क आणि वसतिगृह शुल्कात विशेष सवलत सुद्धा देत आहेत.

दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी रशियाला वैद्यकीय आणि इतर विशेष अभ्यासक्रमांचा अभ्यास करण्यासाठी जातात.

भारतीय वैद्यकीय विद्यार्थी मोठ्या संख्येने युक्रेनमध्येही वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जातात. दोन्ही देशांतील युद्धामुळे 20 हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य अनिश्चिततेच्या गर्तेत सापडलंय.