NEET UG 2024 : तर नीट यूजी परीक्षा रद्द होणार, सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीमध्ये थेट…

नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी सातत्याने विद्यार्थ्यांकडून केली जातंय. निकाल लागल्यानंतर अनेक आरोप सातत्याने केले जात आहेत. हेच नाहीतर हे प्रकरण कोर्टात पोहोचले आहे. नीट परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थी चक्क रस्त्यावर उतरले आणि परीक्षा रद्द करण्याची मागणी करताना दिसले.

NEET UG 2024 : तर नीट यूजी परीक्षा रद्द होणार, सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीमध्ये थेट...
NEET UG
Follow us
| Updated on: Jul 08, 2024 | 4:36 PM

नीट परीक्षेच्या निकालानंतर देशभरात गोंधळ बघायला मिळाला. हेच नाहीतर विद्यार्थी मोठ्या संख्येने नीट परीक्षेच्या निकालाच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले. परीक्षा रद्द करण्याची मागणी सातत्याने विद्यार्थ्यांकडून केली जातंय. निकाल लागल्यानंतर अनेक आरोप सातत्याने केले जात आहेत. मोठा घोटाळा या परीक्षेत झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांचा आहे. काही विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळाले आहेत. हेच नाहीतर ग्रेस गुण मिळाल्याने 720 पैकी 720 मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अचानक वाढली. गेल्या वर्षी एकाही विद्यार्थाला 720 पैकी 720 मार्क मिळाले नव्हते.

यासोबतच पेपर फुटीचाही आरोप सातत्याने केला जातोय. आता नीट परीक्षेचे प्रकरण थेट कोर्टात गेले आहे. नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणातील 38 याचिका सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्या आहेत. त्यापैकी जास्त करून याचिका या नीट यूजी परीक्षा रद्द करण्याबाबतच्या आहेत. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या याचिकांवर सुनावणी केलीये.

मुळात म्हणजे केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नीट यूजी परीक्षा रद्द करण्यास विरोध केला होता. जर परीक्षा रद्द केली तर वर्षभर अभ्यास केलेल्या लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, असे केंद्र शासनाने म्हटले आहे. या प्रकरणात आता पुढील सुनावणी ही गुरूवारी होणार आहे. 

CJI ने म्हटले की, परीक्षेच्या काही गोष्टींमुळे अनेक परिणाम झाले आहेत. परीक्षेच्या दिवशीच विद्यार्थ्यांना पेपर मिळाला. मग याचा अर्थ असा होतो की, स्थानिक पातळीवर पेपर फुटला आहे. परंतू, या पेपरफुटीमध्ये नेमके किती विद्यार्थी सहभागी होते, हे सांगता येत नाही. जर यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक असेल तर पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेशा द्या. यासोबत भविष्यात अशा घटना घडून नये, यासाठी उपायोजनांबद्दलची चर्चा झालीये. 

CJI ने एनटीएला पेपर प्रिंटिंगपासून ते परीक्षा हॉलमध्ये पोहोचवण्यापर्यंतच्या प्रक्रियेशी संबंधित 11 प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. पेपरफुटीचा वेळ आणि पेपरमधील अंतर काय आहे हे जाणून घेण्यासाठी हे विचारण्यात आले. 23 लाखांहून अधिक विद्यार्थी असून मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळल्यास पेपर रद्द करावे लागतील, असेही स्पष्ट सांगण्यात आलंय. म्हणजेच आता परीक्षा रद्द होणार की, अजून काही यासंदर्भातील सुनावणी ही गुरूवारी होईल. 

Non Stop LIVE Update
ओसंडून वाहू लागला अजिंठा लेणीचा धबधबा; बघा नयनरम्य दृश्य
ओसंडून वाहू लागला अजिंठा लेणीचा धबधबा; बघा नयनरम्य दृश्य.
धुळ्यातील लळींग येथील धबधबा कोसळण्यास सुरूवात, पर्यटकांचा ओघ सुरू
धुळ्यातील लळींग येथील धबधबा कोसळण्यास सुरूवात, पर्यटकांचा ओघ सुरू.
भुजबळ-पवारांच्या भेटीवर भाजप नेत्याची भुवया उंचवणारी प्रतिक्रिया
भुजबळ-पवारांच्या भेटीवर भाजप नेत्याची भुवया उंचवणारी प्रतिक्रिया.
आरक्षणाचा वाद सोडवण्यासाठी शरद पवार पुढाकार घेणार? भुजबळांना दिला शब्द
आरक्षणाचा वाद सोडवण्यासाठी शरद पवार पुढाकार घेणार? भुजबळांना दिला शब्द.
भेटीत काय झालं? भुजबळ स्पष्ट म्हणाले, शरद पवारांनी मला बोलवलं अन्...
भेटीत काय झालं? भुजबळ स्पष्ट म्हणाले, शरद पवारांनी मला बोलवलं अन्....
फक्त QR कोड स्कॅन करा, लाडकी बहीण योजेनेचे लाभार्थी व्हा, कसं ते बघा?
फक्त QR कोड स्कॅन करा, लाडकी बहीण योजेनेचे लाभार्थी व्हा, कसं ते बघा?.
वेटिंगनंतर भेट, छगन भुजबळ सिल्व्हर ओकवर, शरद पवारांची अचानक भेट का?
वेटिंगनंतर भेट, छगन भुजबळ सिल्व्हर ओकवर, शरद पवारांची अचानक भेट का?.
कोकणरेल्वे ठप्प, अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला लालपरी, कुठून किती बसेस
कोकणरेल्वे ठप्प, अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला लालपरी, कुठून किती बसेस.
कोकण रेल्वे ठप्प, प्रवासी अडकले; कधी होणार रेल्वे वाहतूक सुरू?
कोकण रेल्वे ठप्प, प्रवासी अडकले; कधी होणार रेल्वे वाहतूक सुरू?.
रत्नागिरीला रेड, या 11 जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट, यात तुमच्या जिल्हा आहे?
रत्नागिरीला रेड, या 11 जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट, यात तुमच्या जिल्हा आहे?.