AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satara Lok Sabha Results : सातारा लोकसभा निकाल 2019

सातारा लोकसभा मतदारसंघ निकाल : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी बाजी मारली. इथे त्यांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव केला. उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26 मतं, तर नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार498 मतं मिळाली. उदयनराजे भोसले यांनी मागील 2014 च्या निवडणुकीत जवळपास साडेतीन लाख मतांनी विजय मिळवला होता. […]

Satara Lok Sabha Results : सातारा लोकसभा निकाल 2019
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: May 24, 2019 | 10:03 AM
Share

सातारा लोकसभा मतदारसंघ निकाल : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी बाजी मारली. इथे त्यांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव केला. उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26 मतं, तर नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार498 मतं मिळाली. उदयनराजे भोसले यांनी मागील 2014 च्या निवडणुकीत जवळपास साडेतीन लाख मतांनी विजय मिळवला होता. मात्र यंदा त्यांची आघाडी जवळपास 2 लाख मतांनी घटली आहे. 2014 मध्ये उदयनराजे भोसले 3 लाख 66 हजार 594 मतांनी विजयी झाले होते. यंदा उदयनराजेंना इतकं लीड घेता आलं नाही. 2019 च्या निवडणुकीत राजेंना 1,26,528 मतांनी  विजय मिळवता आला.

लोकसभा निवडणुकीसाठी सातारा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं. या निवडणुकीत या मतदारसंघात 60.33  टक्के मतदानाची नोंद झाली. यावेळी येथे 2014 च्या तुलनेत 3.33 टक्क्यांनी मतदान वाढले. या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले आणि भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली.

सातारा लोकसभा निवडणूक अंतिम निकाल 2019

1) आनंद थोरावडे-6963

2) श्री.छ. उदयनराजे भोसले-579026 (राष्ट्रवादी)

3) नरेंद्र पाटील-452498 (शिवसेना)

4) दिलीप जगताप-5055

5) सहदेव ऐवळे-40673

6) अभिजित बिचुकले-2412

7) पंजाबराव पाटील-5141

8) शैलेंद्र वीर-5846

9) सागर भिसे-8593

10) नोटा-9227

एकूण मतदान- 11,17,757

उदयनराजे भोसले 1,26,528 मतांनी विजयी

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनानरेंद्र पाटील (शिवसेना)पराभूत
काँग्रेस/ राष्ट्रवादीउदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)विजयी
अपक्ष/इतरसहदेव एवळे (VBA)पराभूत

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली