काँग्रेसला प्रचंड मोठा धक्का, उमेदवाराचा अर्जच बाद; रामटेकमध्ये मोठी उलथापलथ होणार?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रत्येक पक्षात महत्त्वाच्या घडामोडी सुरु आहेत. प्रत्येक पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या 19 एप्रिलला असल्याने या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज देखील भरण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 27 मार्च होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून उमेदवारांच्या अर्जांची छाननी केली जात आहे. या छाननीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण काँग्रेसच्या रामटेक लोकसभेच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे.

काँग्रेसला प्रचंड मोठा धक्का, उमेदवाराचा अर्जच बाद; रामटेकमध्ये मोठी उलथापलथ होणार?
काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 9:18 PM

काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द झाली आहे. रश्मी बर्वे यांचं जातप्रमाणपत्र आज सकाळीच रद्द झालं होतं. त्यानंतर आज संध्याकाळी रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. रश्मी बर्वे यांच्यासह त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांच्याकडूनही उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. रश्मी बर्वे यांचे जातप्रमाणपत्र अवैध असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून केला जात होता. पण रश्मी यांनी सर्व आरोप फेटाळले होते. आपल्याविरोधात विरोधकांचं हे षडयंत्र असल्याचं रश्मी बर्वे म्हणाल्या होत्या. पण त्यानंतर त्यांचं जातप्रमाणपत्र आज सकाळी जात पडताळणीत रद्द झालं होतं. त्यानंतर आज संध्याकाळी रश्मी बर्वे यांची उमेदवारी निवडणूक आयोगाकडून रद्द करण्यात आली आहे.

रामटेक ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. काँग्रेसकडून या मतदारसंघातून रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. पण रश्मी बर्वे यांचं जातप्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र हे जात पडताळणी समितीने रद्द केलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून त्यांचा उमेदवारी अर्ज आज छाननीत रद्द करण्यात आला आहे.

श्यामकुमार बर्वे आता काँग्रेसचे उमेदवार

रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. रश्मी बर्वे यांच्याविरोधात बाजू मांडणाऱ्या वकिलांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिलीय. “आमचा आक्षेप मंजूर करण्यात आलाय. रश्मी बर्वे यांच्या एबी फॉर्मवर श्यामकुमार बर्वे यांचं नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे श्यामकुमार बर्वे हेच उमेदवार असतील, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे”, अशी माहिती वकिलांनी दिली.

हे सुद्धा वाचा

नेमकं प्रकरण काय?

रश्मी बर्वे यांची कास्ट वैलिडिटी प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने आज रद्द केलं. त्यानंतर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेक मतदारसंघातून रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. सुनील साळवे नावाच्या व्यक्तीने रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र तयार करताना बनावट कागदपत्र दिल्याची तक्रार केली होती. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी चौकशी करून अहवाल तात्काळ देण्याची सूचना जात पडताळणी समितीला सामाजिक न्याय विभागाने केली होती.

जात पडताळणी समितीने आज रश्मी बर्वे यांचे अनुसूचित जातीतील ‘चांभार’ जातीचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द केलं. यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत सुनावणी पूर्ण केली. यावेळी रश्मी बर्वे यांची रामटेक मधून काँग्रेस तर्फे देण्यात आलेले उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय देण्यात आला. आता रश्मी बर्वे यांच्या नंतर पर्यायी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेले त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे रामटेकमधून अधिकृत उमेदवार असतील, अशी प्रतिक्रिया आक्षेपकाचे वकील मोहित खजानची यांनी दिली.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.