बहिणीला तिकीट दिल्याने, काँग्रेसचा नाराज उमेदवार भाजपमध्ये दाखल

| Updated on: Jan 16, 2022 | 4:16 PM

पंजाबमध्ये काँग्रेसने 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये त्यांनी सध्याचे काँग्रेसचे आमदार हरजोत कमाल यांना डावलून मालविका सूद यांना तिकीट जाहीर केल्यामुळे आमदार हरजोत कमाल यांनी भाजपची वाट धरली आहे

बहिणीला तिकीट दिल्याने, काँग्रेसचा नाराज उमेदवार भाजपमध्ये दाखल
पंजाब काँग्रेसचे आमदार हरजोत कमाल
Follow us on

पंजाब – पाच राज्यांमधल्या निवडणुकांनी देशातलं राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं दिसतंय. कारण सर्वच पक्षांच्या पहिल्या याद्या (list) जाहीर झाल्याने नाराज उमेदवार इतर पक्षांच्या वाटेवर असल्याचं चित्र आहे. पंजाबमध्ये (punjab) काँग्रेसकडून सोनू सूद (sonu sood) यांच्या बहिणीला तिकीट जाहीर झाल्यानंतर तेथील काँग्रेसच्या उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश घेऊन काँग्रेससमोर मोठं आवाहन उभं केलं आहे.

पंजाबमध्ये काँग्रेसने 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये त्यांनी सध्याचे काँग्रेसचे आमदार हरजोत कमाल यांना डावलून मालविका सूद यांना तिकीट जाहीर केल्यामुळे आमदार हरजोत कमाल यांनी भाजपची वाट धरली आहे. मालविकाने काही दिवसापुर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपकडून त्यांना तिथे उमेदवारी मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले, “मोगा येथील काँग्रेस आमदार आणि लोकप्रिय नेते डॉ. हरजोत कमल यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना पाहूण खूप आनंद झाला आहे. ते आमच्या पक्षात आल्यामुळे आमची तेथील ताकद वाढेल.

सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत काँग्रेसने आपल्या उमेदवारांची नावे निश्चित केली. राज्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी पुन्हा एकदा चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून आपलं नशीब आजमावन्याचा प्रयत्न करणार आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवतील . त्याचवेळी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा हे त्यांच्या सध्याच्या डेरा बाबा नानकमधून निवडणूक लढणार आहेत.

पंजाबमध्ये 14 फेब्रुवारीला मतदान होईल, त्याबरोबर झालेल्या निवडणुकीचा निकाल 10 मार्चला असेल.

मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती? पहिल्या स्थानी चन्नी, सिद्धू कितव्या?

5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार, निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद

विधानसभा निवडणुकांवर खलबतं, आरोग्य सचिवांशी चर्चेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाची दिल्लीत बैठक