AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सह-अभिनेत्यावर लैंगिक छळाचे आरोप, कोर्टाचा 38 वर्षीय अभिनेत्रीला मोठा धक्का, नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वीच मनोरंजन क्षेत्रातील दोन मोठे कलाकार एकमेकांशी भिडताना दिसले. यामध्ये अभिनेत्रीने एका अभिनेत्यावर विनयभंगाचा आरोप केला. मात्र, कोर्टाने आरोप फेटाळले.

सह-अभिनेत्यावर लैंगिक छळाचे आरोप, कोर्टाचा 38 वर्षीय अभिनेत्रीला मोठा धक्का, नेमकं काय घडलं?
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 06, 2026 | 1:20 PM
Share

Hollywood Actress : हॉलिवूडमध्ये सध्या ब्लेक लिव्हली आणि जस्टिन बाल्डोनी यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. दोघांमधील हा वाद आता न्यायालयात पोहोचला असून, अलीकडील सुनावणीपूर्वीच ब्लेक लिव्हलीने आपली भूमिका स्पष्ट करत हा संघर्ष शेवटपर्यंत नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

3 एप्रिल रोजी सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधताना ब्लेक लिव्हलीने सांगितले की, अनेकदा खराब व्यवस्था पीडितांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करते. मात्र, अशा व्यवस्थेला आणि पीडितांना गप्प बसवणाऱ्या लोकांना उघड करण्यासाठी ती ही लढाई सुरूच ठेवणार आहे. ती म्हणाली, ‘मी स्वतःला भाग्यवान समजते की मला माझ्यासाठी उभं राहण्याची संधी मिळाली. प्रत्येकाला ही संधी मिळत नाही आणि मी ती वाया जाऊ देणार नाही.’

कोर्टाच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया

ब्लेक लिव्हलीने हा ठाम पवित्रा फेडरल न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयानंतर घेतला आहे. न्यायालयाने तिने दाखल केलेल्या 13 मुद्द्यांपैकी 10 मुद्दे फेटाळले, ज्यामध्ये छेडछाडीशी संबंधित काही आरोपांचाही समावेश होता.

तरीही, करारभंग आणि Wayfarer Studios या जस्टिन बाल्डोनीच्या कंपनीविरुद्ध केलेले सूडबुद्धीने कारवाईचे आरोप यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुनावणी सुरूच राहणार आहे. या निर्णयानंतर ब्लेक लिव्हलीने दिलासा व्यक्त करत म्हटलं की, ‘माझ्या केसच्या मुख्य मुद्द्यांवर पुढील महिन्यात ज्युरीसमोर सुनावणी होणार आहे. याबद्दल मी आभारी आहे. त्यामुळे मला माझी बाजू पूर्णपणे मांडण्याची संधी मिळणार आहे.’

वादाची सुरुवात कशी झाली?

हा संपूर्ण वाद It Ends with Us या कादंबरीवर आधारित It Ends with Us चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुरू झाला. डिसेंबर 2024 मध्ये ब्लेक लिव्हलीने जस्टिन बाल्डोनीविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती.

तिने आरोप केला होता की, शूटिंगदरम्यान बाल्डोनीने तिच्याशी अयोग्य वर्तन केले आणि नंतर तिच्याविरोधात बदनामी करण्यासाठी मोहीम राबवली. मात्र, जस्टिन बाल्डोनीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

या प्रकरणात जस्टिन बाल्डोनीनेही प्रतिदावे दाखल केले होते, ज्यामध्ये खंडणी आणि मानहानीचे आरोप होते. मात्र, जून 2025 मध्ये न्यायालयाने हे दावे फेटाळले. त्यानंतर त्यांच्या कायदेशीर टीमने हे दावे पुन्हा दाखल न करण्याचा निर्णय घेतला.सध्या या प्रकरणातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुनावणी सुरु आहे.

Follow Us
ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! कोर्टात आज काय घडणार
Shivsena | ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज काय घडणार?
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
Ravindra Chavan | काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो; रवींद्र चव्हाणांचा भाजप युवा मोर्चाला खडेबोल
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
Eknath Shinde | सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांना हे चिन्ह...
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी