AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘3 इडियट्स’च्या ‘मिलीमीटर’ने तुर्की गर्लफ्रेंडशी केलं लग्न; नेटकरी म्हणाले ‘हा तर किलोमीटर बनला’

'थ्री इडियट्स' या चित्रपटातील मिलीमीटरची भूमिका पाहून तुर्कीतली तरुणी त्याच्या प्रेमात पडली. त्यानंतर तिने सोशल मीडियावर राहुलला मेसेज केला आणि तिथूनच त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली. या दोघांनी आता लग्न केलं आहे.

'3 इडियट्स'च्या 'मिलीमीटर'ने तुर्की गर्लफ्रेंडशी केलं लग्न; नेटकरी म्हणाले 'हा तर किलोमीटर बनला'
3 idiots fame milimeter aka rahul kumarImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 13, 2025 | 8:50 PM
Share

आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ या चित्रपटातील मिलीमीटर तुम्हाला आठवतोय का? या चित्रपटात मिलीमीटरची भूमिका तशी छोटीच होती, पण त्यातही त्याने विशेष छाप सोडली होती. ही भूमिका साकारलेला राहुल कुमार आता सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. राहुल कुमार लग्नबंधनात अडकला असून त्याची पत्नी तुर्कीची आहे. राहुलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये तो पत्नीची ओळख करून देताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी राहुलच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर जाऊन त्याला शुभेच्छा देत आहेत.

या व्हिडीओमध्ये राहुल सांगतोय, “हाय, मी राहुल आहे. ही माझी पत्नी केजीबन आहे. ती तुर्कीची आहे.” यानंतर त्याची पत्नी स्मितहास्य करत सांगते, “होय आणि आम्ही 4 मे रोजी लग्न केलंय.” राहुलला त्याची जोडीदारसुद्धा ‘3 इडियट्स’मधील भूमिकेमुळेच भेटली आहे. या चित्रपटात राहुलचं काम पाहिल्यानंतर केजीबनने त्याच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. जवळपास 14 वर्षांपूर्वी ‘3 इडियट्स’च्या मिलीमीटरची लव्हस्टोरी सुरु झाली होती.

View this post on Instagram

A post shared by Rahul Kumar (@isthis_rahul)

राहुलच्या इन्स्टाग्रामवर आमिर खानशिवाय बॉलिवूडमधील इतर कलाकारांसोबतचेही फोटो पहायला मिळतात. राजू हिरानी, शाहरुख खान आणि बोमन इराणी यांच्यासोबतचे फोटो त्याने शेअर केले आहेत. राहुलने ‘बंदिश बँडिट्स’ या गाजलेल्या वेब सीरिजमध्येही काम केलंय. पत्नीसोबतचा फोटो पोस्ट करत त्याने लिहिलं, ‘आम्ही जिंकलो’. त्याच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी काही मजेशीर कमेंट्ससुद्धा केल्या आहेत. ‘मिलीमीटर आता किलोमीटर बनला आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘हा तर कुणाल खेमूसारखा दिसतोय’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘जहांपनाह.. तौफा कुबूल किया?’ असाही डायलॉग एका नेटकऱ्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिला आहे.

2009 मध्ये आमिर खानचा ‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये एका इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये छोटीमोठी कामं करणाऱ्या ‘मिलीमीटर’ची भूमिका राहुलने साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. शिवाय ‘मिलीमीटर’ हे भूमिकेचं अनोखं नावसुद्धा चांगलंच गाजलं.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.