AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PhotoBomb : कपूर आणि भट्ट कुटुंबियांचं व्हेकेशन, आलियानं शेअर केला जबरदस्त फोटो

(Vacation of Kapoor and Bhatt family, great photo shared by Alia)

PhotoBomb : कपूर आणि भट्ट कुटुंबियांचं व्हेकेशन, आलियानं शेअर केला जबरदस्त फोटो
हा चित्रपट फाळणीच्या आधी आणि नंतरची कथा देखील दाखवण्यात आली आहे. हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकात असे सांगितले गेले आहे की, गांगुबाई हे 60 च्या दशकात मुंबई माफियाचे एक मोठे नाव होते.
| Updated on: Dec 31, 2020 | 6:02 PM
Share

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय जोडी म्हणजेच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या कुटुंबियांसोबत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी राजस्थानमध्ये पोहोचले आहेत. रणथंभोरमध्ये कपूर आणि भट्ट कुटुंबं खूप धमाल करत आहे. आलिया भट्टनं तिच्या या ट्रीपमधील एक अतिशय सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलियासोबत रणबीर कपूरही दिसतोय.आलियाचा हा लूक तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.

‘भविष्यासाठी चीअर्स..’ असं कॅप्शन देत आलियानं हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलियानं गुलाबी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. सोबतच तिनं एक लांब कोट, बूट्स आणि डोक्यावर कॅप कॅरी केली आहे. तिनं ड्रिंकचा ग्लास देखील हातात धरला आहे. आलियाच्या या फोटोमध्ये रणबीर कपूरसुद्धा दिसतोय.

फोटो क्रॉप का केला…?

आलियाचा हा फोटो बघून एकानं ‘रणबीरला का क्रॉप केलं असं कमेंटमध्ये विचारलं आहे.’ तर एकानं ‘फोटोमधून बॉयफ्रेंडला कसं क्रॉप करायचं ते शिका’ अशी कमेंट केली आहे. गेले अनेक दिवस आलिया आणि रणबीर या दोघांच्या लग्नाची चर्चा आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांनी ‘तुम्ही लग्न कधी करणार’ असा प्रश्नसुद्धा विचारला आहे.

कपूर आणि भट्ट कुटुंब एकत्र राजस्थानमध्ये गेल्यानं आलिया आणि रणबीरच्या साखरपुड्याच्या बातम्या व्हायरल झाल्या मात्र रणधीर कपूर यांनी या बातम्या फेक असल्याचं सांगितलं. सोबतच दोन्ही कुटुंब एकत्र नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी गेले असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

…तर, आम्हीही तिथे असतो! यासंदर्भात अभिनेते रणधीर कपूर यांनी एका प्रसिद्ध वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. या मुलाखती दरम्यान रणधीर कपूर म्हणाले की, ‘रणबीर-आलियाच्या साखरपुड्याची बातमी पूर्णपणे अफवा आहे. जर, आज रणबीर आणि आलियाचा साखरपुडा होत असेल, तर मी व माझे कुटुंबियही त्यांच्याबरोबर तिथे दिसलो असतो. रणबीर, आलिया आणि नीतू नवीन वर्ष साजरे करण्यासाठी तिथे गेले आहेत. माध्यमांमध्ये फिरत असलेली ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे.’

या ट्रीपमध्ये आलिया आणि रणबीरबरोबर नीतू कपूर, आलिया, शाहीन भट्ट, सोनी राझदान, रिद्धिमा कपूर, पती भरत, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणही रणथंभोरमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत.

कोरोना नसता, तर इतक्यात लग्न केलं असतं… रणबीरने नुकत्याच एका वेबसाईटला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने आलियासोबतच्या नात्यावर भाष्य केले होते. रणबीर म्हणाला की, ‘आम्ही दोघांनी लॉकडाऊनमध्ये एकत्र वेळ घालवला. दिवसभर मी चित्रपट आणि कार्यक्रम बघायचो, तर आलिया काहीतरी नवीन शिकत असायची.’ जेव्हा राजीव मसंदने रणबीरला लॉकडाऊनमध्ये कुठला ऑनलाईन क्लास घेतला आहेस का, असे विचारले तेव्हा रणबीर म्हणाला, ‘माझी गर्लफ्रेंड आलिया जास्त काम करणारी आहे. तिने या काळात गिटार शिकण्यापासून ते पटकथालेखनापर्यंतचे सर्व ऑनलाईन क्लास केले. तिच्यासमोर मला नेहमीच अंडरअचिव्हर असल्यासारखं वाटत आहे. परंतु, मी या काळात कुठलाही ऑनलाईन क्लास केला नाही.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.