Alia-Ranbir Engagement  | आलिया भट्ट-रणबीर कपूरचा साखरपुडा? वाचा रणधीर कपूर काय म्हणाले…

Alia-Ranbir Engagement  | आलिया भट्ट-रणबीर कपूरचा साखरपुडा? वाचा रणधीर कपूर काय म्हणाले...

बॉलिवूडची बहुचर्चित सुप्रसिद्ध जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आपल्या कुटुंबियांसह राजस्थानमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत.

Harshada Bhirvandekar

|

Dec 30, 2020 | 4:26 PM

मुंबई : बॉलिवूडची बहुचर्चित सुप्रसिद्ध जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आपल्या कुटुंबियांसह राजस्थानमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. कपूर आणि भट्ट कुटुंबियांसह अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणही त्याच हॉटेलमध्ये मुक्कामाला गेले आहेत. हे दोन्ही कपल एकत्र नवीन वर्ष साजरे करणार आहेत (Uncle Randhir Kapoor on Alia Bhatt and Ranbir kapoor’s engagement).

यादरम्यान, आज (30 डिसेंबर) रणबीर-आलियाचा साखरपुडा (Alia Ranbir Engagement) असल्याचे वृत्त सगळीकडे चर्चेत आहे. या कथित वृत्तानुसार, आलिया आणि रणबीर आज रणथंभोरमध्ये साखरपुडा करणार होते. पण रणबीरचे काका, अभिनेते रणधीर कपूर यांनी या ‘साखरपुड्या’च्या वृत्ताला अफवा म्हटले आहे. ही दोन्ही कुटुंब केवळ एकत्र नवीन वर्ष साजरे करण्यासाठी राजस्थानमध्ये गेली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

…तर, आम्हीही तिथे असतो!

यासंदर्भात अभिनेते रणधीर कपूर यांनी एका प्रसिद्ध वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. या मुलाखती दरम्यान रणधीर कपूर म्हणाले की, ‘रणबीर-आलियाच्या साखरपुड्याची बातमी पूर्णपणे अफवा आहे. जर, आज रणबीर आणि आलियाचा साखरपुडा होत असेल, तर मी व माझे कुटुंबियही त्यांच्याबरोबर तिथे दिसलो असतो. रणबीर, आलिया आणि नीतू नवीन वर्ष साजरे करण्यासाठी तिथे गेले आहेत. माध्यमांमध्ये फिरत असलेली ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे.’

कपूर-भट्ट फॅमिली ट्रीप

केवळ रणबीर कपूर आणि आलिया भट्टच नव्हे तर, रणबीरची आई अभिनेत्री नीतू कपूर, आलियाची बहिण शाहीन भट्ट, आई सोनी रझदान, रिद्धिमा कपूरसह तिचा नवरा भरत सहानी, अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणदेखील राजस्थानच्या या फॅमिली ट्रीपमध्ये सहभागी झाले आहेत. या सर्वांना एकत्र पाहून, आज रणबीर आणि आलिया हे दोघेही साखरपुडा उरकून, नवीन वर्षाच्या आधी त्यांची ही चांगली बातमी चाहत्यांना देतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता (Uncle Randhir Kapoor on Alia Bhatt and Ranbir kapoor’s engagement).

कोरोना नसता, तर इतक्यात लग्न केलं असतं…

रणबीरने नुकत्याच एका वेबसाईटला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने आलियासोबतच्या नात्यावर भाष्य केले होते. रणबीर म्हणाला की, ‘आम्ही दोघांनी लॉकडाऊनमध्ये एकत्र वेळ घालवला. दिवसभर मी चित्रपट आणि कार्यक्रम बघायचो, तर आलिया काहीतरी नवीन शिकत असायची.’ जेव्हा राजीव मसंदने रणबीरला लॉकडाऊनमध्ये कुठला ऑनलाईन क्लास घेतला आहेस का, असे विचारले तेव्हा रणबीर म्हणाला, ‘माझी गर्लफ्रेंड आलिया जास्त काम करणारी आहे. तिने या काळात गिटार शिकण्यापासून ते पटकथालेखनापर्यंतचे सर्व ऑनलाईन क्लास केले. तिच्यासमोर मला नेहमीच अंडरअचिव्हर असल्यासारखं वाटत आहे. परंतु, मी या काळात कुठलाही ऑनलाईन क्लास केला नाही.

आलिया सोबतच्या लग्नाच्या प्लानबाबत विचारले असता रणबीर म्हणाला की, जर हा महामारीचा कालावधी आपल्या आयुष्यात आला नसता, तर आत्तापर्यंत आम्ही लग्न केले असते. मला माझ्या आयुष्यातील सगळी ध्येय लवकरात लकवर पूर्ण करायची आहेत.

(Uncle Randhir Kapoor on Alia Bhatt and Ranbir kapoor’s engagement)

हेही वाचा :

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें