Fee Hike | ‘ब्रह्मास्त्र’साठी रणबीरने मागितले जास्त पैसे?, वाचा काय आहे सविस्तर प्रकरण…

कोरोना विषाणूमुळे देश आणि जगावर मोठे संकट आले आहे. दरवर्षी जिथे भारतीय चित्रपटसृष्टी कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय कर असते.

Fee Hike | ‘ब्रह्मास्त्र'साठी रणबीरने मागितले जास्त पैसे?, वाचा काय आहे सविस्तर प्रकरण...
ही शॉर्टफिल्म रणबीरची डेब्यू फिल्म सावरियापूर्वी तयार करण्यात आला होता. इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी इतर प्रोजेक्ट्सवर काम केलं आहे.

मुंबई : कोरोना विषाणूमुळे देश आणि जगावर मोठे संकट आले आहे. दरवर्षी जिथे भारतीय चित्रपटसृष्टी (Indian Film Industry) कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करत असते, यावर्षी चित्रपटसृष्टीला देखील फटका बसला आहे. कोरोनामुळे अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटासह अनेक चित्रपटांचे शूटिंग थांबले होते. लॉकडाउन संपल्यानंतर रणबीर पुन्हा एकदा आपल्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त झाला आहे. दरम्यान, रणबीर कपूर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या शूटिंगच्या अतिरिक्त दिवसांसाठी अतिरिक्त पैसे घेणार असल्याची बातमी समोर येत आहे. (Is Ranbir Kapoor asking for more money for ‘Brahmastra’?)

स्पॉटबॉयच्या सूत्रांनी हे नाकारले आहे, कोणतेही चित्रपट निर्माते अशी मागणी पूर्ण करू शकत नाहीत.असे बरेच चित्रपट आहेत ज्यांचे शूटिंग मागे पुढे होत असते. त्यापैकी रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ देखील एक आहे. याचा अर्थ असा नाही की, रणबीर कपूर आपल्या निर्माता करण जोहरकडे जास्त पैसे मागू शकतो.

या सूत्राने चर्चेत आलिया भट्टचेही उदाहरण दिले. आलियासुद्धा गंगूबाई काठियावाडीला दिलेल्या तारखेपूर्वी काही दिवस शूट करत आहे. आता ती संजय लीला भन्साळींकडून जादा पैसे मागणार आहे का? रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाद्वारे स्क्रीन शेअर करताना दिसतील. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट आहे. या चित्रपटात रणबीर आणि आलियाशिवाय अमिताभ बच्चन देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. जरी हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे शूटिंगमध्येच थांबले होते.

संबंधित बातम्या : 

Kangana Ranaut | कंगनाची मुंबईवारी, पुन्हा रंगणार ‘सामना’?

Aashram New Season | वादाच्या भोवऱ्यात अडकूनही ‘आश्रम’ सीरीज परत एकदा करणार धमाका?

(Is Ranbir Kapoor asking for more money for ‘Brahmastra’?)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI