Aashram New Season | वादाच्या भोवऱ्यात अडकूनही ‘आश्रम’ सीरीज परत एकदा करणार धमाका?

अनेक वादविवादानंतर आता प्रकाश झा दिग्दर्शित 'आश्रम' बेव सीरिजचा पुढचा भाग लवकरच येणार आहे.

Aashram New Season | वादाच्या भोवऱ्यात अडकूनही 'आश्रम' सीरीज परत एकदा करणार धमाका?

मुंबई : अनेक वादविवादानंतर आता प्रकाश झां (Prakash Jha) दिग्दर्शित ‘आश्रम’ बेव सीरिजचा पुढचा भाग लवकरच येणार आहे. याबद्दल बोलताना प्रकाश झां म्हणाले की, परिस्थिती थोडीशी ठीक होताच आम्ही शूटचे वेळापत्रक तयार करणार आहोत. सध्या गोष्टी थोड्या ठीक झाल्या आहेत मात्र, अलीकडेच एक नवीन व्हायरलबाबत ऐकायला येत आहे. ज्यामुळे शूटिंगला सुरूवात होण्यासाठी थोडा वेळ लागेल. (The sequel to the Ashram web series is coming soon to the audience)

आश्रमच्या पहिल्या हंगामाचे शूट 3 महिन्यांत अयोध्येत झाले होते. प्रकाश झा पुढे म्हणाले, “आम्हाला माहित होते की, आमच्याकडे एक चांगली कथा आहे. यामुळे आश्रमला इतका चांगला प्रतिसाद मिळला. याबाबत बॉबी देओल (Bobby Deol)  म्हणतो की, सर्व परिस्थिती ठीक झाल्याबरोबर शूट सुरू होईल. कदाचित शूटिंग मार्च किंवा एप्रिलमध्ये सुरू होईल. बॉबी  ‘ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला यावी हाच आमचा प्रयत्न आहे. मी अद्याप स्क्रिप्ट वाचली नाही, परंतु मी पुढच्या हंगामासाठी उत्सुक आहे.

अभिनेता बॉबी देओल आणि प्रकाश झा निर्मित ‘आश्रम’ या वेब सीरीजच्या दुसऱ्या पर्वाला करणी सेनेने विरोध देखील केला होता. वेब सीरीजच्या प्रदर्शनानंतर करणी सेनेने निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. धार्मिक भावना दुखावल्याने या वेब सीरीजवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणी सेनेने केली होती.

‘आश्रम’ या वेब सीरीजमध्ये बॉबी देओल मुख्य भूमिकेत आहे. त्याचे पात्र एका ढोंगी बाबाची कथा सांगणारे आहे. या वेब सीरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. मात्र, धार्मिक भावना दुखावल्याचे कारण देत, करणी सेनेने यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. करणी सेनेने वकिला मार्फत कायदेशीर नोटीसही प्रकाश झां यांना पाठवली होती.

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल अभिनित ‘आश्रम चॅप्टर-2’ या वेब सीरीजमध्ये सनातन धर्माशी संबंधित धार्मिक भावना दुखावणारे दृश्य चित्रित केल्याचा आरोप करत दिवाणी कोर्टाच्या वकिलाने जौनपूर न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी अभिनेता बॉबी देओल आणि दिग्दर्शक प्रकाश झां  यांच्या विरोधात स्थानिक न्यायालयात खटलाही दाखल केला गेला. जौनपूर दिवाणी कोर्टाचे वकील हिमांशु श्रीवास्तव यांनी उपेंद्र विक्रम सिंह यांच्यामार्फत न्यायालयात हा अर्ज दाखल केला होता.

संबंधित बातम्या : 

New Web Series | सनी लियोनीचा एक्शन धमाका, लवकरच ‘या’ वेब सीरीजमध्ये दिसणार !

फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार 2020 मध्ये ‘पंचायत’ आणि ‘पाताल लोक’ वेब सीरीज सर्वाधिक पुरस्काराचे मानकरी ठरले!

(The sequel to the Ashram web series is coming soon to the audience)

Published On - 12:04 pm, Mon, 28 December 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI