AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule : आज माझा भाऊच नाही राहिला, तर काय उगाच जुनं..सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

Supriya Sule : अजिततदादांच्या जवळचे जे लोक होते, त्यांचा स्टँड पहायला मिळत नाहीय. यावर "या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. जे मी वर्तमानपत्रात वाचते, आमच्या कुटुंबात जी चर्चा झाली. आमचं कुटुंब अडचणीतून चाललं आहे. एकमेकाला आधार देत पुढे जात आहोत" असं सुप्रिया सुळे बोलल्या.

Supriya Sule : आज माझा भाऊच नाही राहिला, तर काय उगाच जुनं..सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
Supriya Sule-Ajit Pawar
| Updated on: Feb 12, 2026 | 12:09 PM
Share

“सगळे डॉक्टर, हेल्थ वर्कर, तुमचं प्रेम, शुभेच्छा यामुळे पवारसाहेबांची तब्येत आता खूप चांगली आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे, रुबी हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर, हेल्थ वर्कर यांचे आभार मानते. पवारसाहेबांची तब्येत चांगली आहे. पाच दिवसांचा अँटी बायोटिक्सचा कोर्स आहे. शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज मिळेल” अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. सुनेत्रा पवारांच्या प्रश्नावरही सुप्रिया सुळे बोलल्या. “वहिनींवर आता नवीन मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू अशी माझी परिस्थिती आहे” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. “वहिनी उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद आहे. पण दादा नसल्याचं दु:ख आयुष्यभर राहिलं. ही प्रेमाची नाती असतात. टाइम हिल्स असं म्हणतात. पण दादा नसल्याचं दु:ख आयुष्यभर राहिलं” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“आमच्या सगळ्या बहिण-भावांचं दादासोबत जे नातं होतं, आमच्या बॅचमध्ये एवढ्या लहान वयात दादा ज्या पद्धतीने गेला, दादाचं जाण्याचं वय नव्हतं. इतक्या वर्षात दादाला कधी थकलेला, आजारी बघितला नाही. आज दादा आपल्यात नाही हे खरं वाटत नाही” असं सुप्रिया सुळे बोलल्या.

पारदर्शकपणे चौकशी होईल

विमान अपघाताच्या चौकशीबद्दल बोलल्या की, “मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे. सविस्तर चौकशी होईल असं त्यांनी म्हटलय. रोहितची अस्वस्थता सहाजिक आहे. मुलांना असं वाटतं. त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत. रोहितने जे प्रश्न मांडलेत, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याने त्याची भावना पारदर्शकपणे मांडली. मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे. पारदर्शकपणे चौकशी होईल. आपण त्याची वाटू पाहू”

तो माझा मोठा भाऊ होता

अजितदादा 12 तारखेला विलिनीकरणाची घोषणा करणार होते, असं शरद पवार बोलले. त्या प्रश्नावरही सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं. “या गोष्टी आयुष्यात होत असतात. आज दादा नाहीत. मला काही जुनी उणी-दुणी काढायची नाहीत. तो माझा मोठा भाऊ होता. माझा दादा होता. माझ्या दादामध्ये आणि माझ्यात जी काही चर्चा झाली, आज माझा भाऊ जिथे असेल तिथे त्याला माहित आहे. दादाच्या इच्छेने, आशिर्वादने पुढे काय होतं ते पाहू” असं सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं.

अजितदादांसोबत जी चर्चा झाली ती राहिली, आता पक्ष आमच्याकडे आहे असं त्या पक्षातील लोकांनी सूचित केलय. यावर “ही लोकशाही आहे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मी माझ्या सीमेत राहून बोलते. माझ्यात आणि दादामध्ये जे बोलणं झालं, ते आम्हा दोघा भावंडांमध्ये आहे. आज माझा भाऊ नाहीय” असं सुप्रिया सुळे बोलल्या.

माझा भाऊ जाऊन 15 दिवसही झाले नाहीत

विलिनीकरणानंतर कोण कुठल्या पक्षात जाणार होतं? एनडीए जॉइंन करणार होता का? “ही लोकशाही आहे. इथे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. आज माझा भाऊच नाही राहिला, तर काय उगाच जुनं काढावं कोणाबद्दल. माझ्यात आणि माझ्या भावात जे बोलणं झालं, ते आमच्या दोघात आहे. वास्तव काय ते आम्हाला माहिती आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुढेही दोन्ही राष्ट्रवादींची चर्चा सुरु राहणार का? “अहो, माझा भाऊ जाऊन 15 दिवसही झाले नाहीत, त्या शॉकमधून आम्हाला बाहेर तर येऊ द्या” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!