AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dead Lizard found in Cake: वाढदिवसासाठी केक आणला, खाताना मेलेली पाल दिसली, 7 ते 8 लोक रुग्णालयात दाखल

नालासोपाऱ्यातून एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे सध्या सगळीकडे छापा मारत आहेत. अनेक भेसळीचे प्रकार सध्या बाहेर येत आहे. आता मात्र नालासोपऱ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Dead Lizard found in Cake: वाढदिवसासाठी केक आणला, खाताना मेलेली पाल दिसली, 7 ते 8 लोक रुग्णालयात दाखल
| Updated on: Aug 16, 2026 | 10:54 AM
Share

नालासोपाऱ्यातून एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. मागील काही दिवस महाराष्ट्रात आणि देशभरात फक्त एका नावाची चर्चा आहे आणि ती म्हणजे तुकाराम मुंडे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे सध्या सगळीकडे छापा मारत आहेत. अनेक भेसळीचे प्रकार सध्या बाहेर येत आहे.  यामुळे अनेकांचे परवाने रद्दही करण्यात आले आहे. आता मात्र नालासोपऱ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाढदिवसासाठी आणलेल्या केकमध्ये मृत पाल आढळल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा केक खाल्ल्यानंतर 7 ते 8 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

या लोकंना आता उपचारासाठी नालासोपारा येथील विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथील नीलकंठेश्वर बिल्डिंगमध्ये एका मुलीचा वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी केक मागवला होता. या सेलिब्रेशनसाठी समोर असलेल्या केक शॉपमधून केक खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे. वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना पाहुण्यांनी केक खाण्यास सुरुवात केली. मात्र, केक खात असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला.  त्यामध्ये मृत पाल आढळली असल्याचा दावा करण्यात आला. केकमध्ये पाल दिसताच पाहुण्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेनंतर 7 ते 8 जणांना अस्वस्थ वाटू लागले असल्याने त्यांना तातडीने विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, संबंधित व्यक्तींची प्रकृती नेमकी कशामुळे बिघडली , याबाबत अधिकृत वैद्यकीय अहवाल अजून समोर आलेला नाही.

रुग्णालयात दाखल झालेल्यांची उर्मिला वर्मा (32), सलोनी गुप्ता (16), सुदीक्षा शाह (19), आफिया इद्रिस (24), रुबी शाह (40), शिव गुप्ता (10), प्रियांश वर्मा (2), परी यादव (7), प्रिया वर्मा (8), रुद्र शाह (13) आणि प्राची यादव (8) अशी नावं आहेत. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समजत आहे. या घटनेची अधिकृत पुष्टी आणि संबंधित प्रशासनाची भूमिका अजून समोर आलेली नसल्याने सगळ्यांचे लक्ष त्याच्यावर असणार आहे.

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...