72nd National Film Award: TV9 चे संजीव श्रीवास्तव यांना उत्कृष्ट चित्रपट समीक्षक राष्ट्रीय पुरस्कार

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शनिवार, १८ जुलै २०२६ रोजी ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली. राजकुमार रावच्या 'श्रीकांत' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. तर TV9 भारत वर्षचे संजीव श्रीवास्तव यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

72nd National Film Award: TV9 चे संजीव श्रीवास्तव यांना उत्कृष्ट चित्रपट समीक्षक राष्ट्रीय पुरस्कार
Sanjeev Srivastava
| Updated on: Jul 18, 2026 | 8:30 PM

National Film Awards 2026: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शनिवारी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या ७२ व्या आवृत्तीची घोषणा केली. या दरम्यान कला क्षेत्रातील वेगळ्या श्रेणीत सर्वश्रेष्ठ परफॉर्मेंसचा सन्मान केला गेला तसेच आर्ट आणि कल्चरवर आपल्या लेखणीतून लोकांना जागृत करणाऱ्या लेखकांचा देखील सन्मान करण्यात आला. या यादीत टीव्ही ९ भारत वर्षचे असिस्टन्ट एडिटर आणि लेखक संजीव श्रीवास्तव यांना सिनेमा जगतातील त्यांच्या उल्लेखनीय कामासाठी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केले गेले.

संजीव श्रीवास्तव बिहारच्या सीतामढी येथील रहाणारे असून ते गेल्या सुमारे अडीच दशकांपासून दिल्लीपासून ते मुंबईतील माध्यमातील मुख्यप्रवाहात सक्रीय आहेत. ब्रेकिंग न्यूज पासून ते क्रिएटिव्ह रायटिंगपर्यंत ते अष्टपैलु आहेत. देश-विदेशातील राजकारण, चित्रपट, साहित्य, क्राईम सारख्या विषयावर ते बिनधास्त शैलीत लिहीतात. ते सहज समजणाऱ्या आणि विचार करणाऱ्या भाषेत लिहिणे पसंद करतात. सिनेमा त्यांचा आवडता विषय आहे. त्यांची सिनेमावर तीन पुस्तके, दोन कांदबरी आणि काही पटकथा – संवाद देखील त्यांनी लिहिले आहेत.

संजीव श्रीवास्तव काय म्हणाले ?

नॅशनल अवॉर्ड मिळाल्याची घोषणा झाल्यानंतर निश्चितच सगळ्यांना आनंद वाटतो. मलाही प्रचंड आनंद वाटत आहे. यामुळे तुमच्या कामाला योग्य प्रकारे परखले गेले आहे हे कळते. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळणे ही एक मोठी गोष्टे आहे. टीव्ही ९ भारतवर्षच्या हिंदी वेबसाईटवर मला सिनेमावर लिहिण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्यासाठी मी माझ्या संस्थेचे आभार व्यक्त करू इच्छीतो. मी माझ्या सर्व वरिष्ठ आदरणीय साथीदारांना धन्यवाद देऊ इच्छीतो. त्यांनी मला हे स्वातंत्र्य दिले.हा सन्मान टीव्ही ९ च्यामुळे मिळण्याची घोषणा केली आहे. सर्वांचा मी आभारी आहे असे संजीव श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.

 

Follow Us