AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका माणसाचे 4 मृतदेह.. डोकं चक्रावून टाकणारा सस्पेन्स; 8 एपिसोड्सची ही सीरिज OTT वर होतेय तुफान ट्रेंड

अनेकांना सस्पेंस असलेले सिनेमे आवडतात. अशात ओटीटी प्लॉटफॉर्मवर 8 एपिसोडची सीरिजची सीरिज ट्रेंडमध्ये आहे. ज्यामध्ये एकाच माणसाचे 4 मृतदेह असतात आणि ते देखील वेगवेगळ्या वर्षात.. तर जाणून घ्या सीरिजबद्दल...

एका माणसाचे 4 मृतदेह.. डोकं चक्रावून टाकणारा सस्पेन्स; 8 एपिसोड्सची ही सीरिज OTT वर होतेय तुफान ट्रेंड
Bodies
| Updated on: Apr 10, 2026 | 11:55 AM
Share

एकाच व्यक्तीचे एक दोन नाही तर, चार मृतदेह असू शकतात? यावर तुमचा देखील विश्वास बसणार नाही… एकाच व्यक्तीचा मृतदेग वर्ष वेगवेगळे पण जागा मात्र एकच… तुम्ही देखील विचार करत असाल की, हे नक्की कसलं कोडं आहे. पण ह्याच एका कोड्यावर संपूर्ण सीरिजची कथा फिरत आहे… या चार मृतदेहांभोवतीचं रहस्य इतकं गुंतागुंतीचं होतं की, उत्कंठा आणि थरार शिगेला पोहोचतो. एवढंच नाही तर, हे सर्व फक्त आठ भागांमध्ये घडतं. ही वेब सिरीज 2023 मध्ये ओटीटीवर प्रदर्शित झाली होती. ही प्रामुख्याने एक रहस्य-थरार सीरिज आहे, जिला प्रेक्षकांनी “सर्वोत्कृष्ट” म्हणून गौरवले आहे.

रिकाम्या वेळेत, प्रवास करत असताना किंवा घरात कोणतं काम करत असताना तुम्ही ‘Bodies’ सीरिज पाहयला कधीच विसरु नका. सीरिजमध्ये रहस्य आणि रोमांच इतकं आहे की, सीरिज संपल्यानंतर देखील डोकं काही वेळासाठी सुन्न पडून जातं.. सीरिज पॉल टॉमलिन यांनी लिहिली आणि निर्मित केली असून, मार्को क्रुझपेंटनर आणि हाओलू वांग यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘बॉडीज’ ही सीरिज 2014 – 15 च्या डीसी व्हर्टिगोच्या त्याच नावाच्या ग्राफिक नॉव्हेलवर आधारित आहे.

8 एपिसोड असलेल्या सीरिजची सुरुवात लंडनच्या व्हाईट चॅपल परिसरातून होते… ते एक मृतदेह आढळतो… असं देखील कळतं की, हाच मृतदेह पूर्वी देखील वेगवेगळ्या वर्षात आढळला आहे. 1890, 1941, 2023 आणि 2053 मध्ये त्याच ठिकाणी मृतदेह सापडतो. ब्रिटनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांचे गुप्तहेर यामुळे गोंधळून जातात आणि पुढे तपास सुरू होतो. गोष्टी जुळू लागतात, पण त्याचबरोबर तणाव वाढतो.

OTT वर कुठे पाहू शकता सीरिज

बॉडीस ही वेब सिरीज 2023 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. ही सिरीज पाहताना तुम्हाला सायन्स फिक्शन, अलौकिक शक्ती आणि भरपूर गूढतेचा अनुभव यईल. जरी कथा पुढे थोडी गुंतागुंतीची होऊ शकते, तरी त्यातील वळणे आणि रहस्ये समजून घेण्यासाठी तुम्हाला ती पाहत राहावे लागेल. हिलिंगहेडच्या भूमिकेत काईल सॉलरचा अभिनय अप्रतिम आहे, तर स्टीफन ग्रॅहमनेही एलियास मॅनिकच्या भूमिकेत आपली छाप सोडली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...