Ramayana Box Office Collection Day 12 : आदिनाथ कोठारेच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर मोठी घसरण! 12 व्या दिवशीच कमाईचा वेग मंदावला
पहिल्या आठवड्यात कोट्यावधींची कमाई करणाऱ्या रामायण चित्रपटाकडून दुसऱ्या आठवड्यातही मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र आता 12 व्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण झाल्याचं समोर आलं आहे.

आदिनाथ कोठारे, रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या रामायण चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू आहे. प्रदर्शनानंतर पहिल्या दिवसापासून या चित्रपटाने कमाईचे रेकॉर्ड ब्रेक केले. पहिल्या आठवड्यात कोट्यावधींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाकडून दुसऱ्या आठवड्यातही मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र आता 12 व्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण झाल्याचं समोर आलं आहे.
आदिनाथ कोठारेचा रामायण 5 नोव्हेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. नितेश तिवारी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून रणबीर कपूरने प्रभू श्रीराम,साई पल्लवीने सीता आणि यशने रावणाची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील भव्य दृश्य, कलाकारांचा लूक आणि कथेमुळे प्रदर्शनाआधीपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती.
चित्रपटाच्या कमाईवर नजर टाकली तर पहिल्या दिवशी 64.85, दुसऱ्या दिवशी 48.05, तिसऱ्या दिवशी 69.80, चौथ्या दिवशी 56.15, पाचव्या दिवशी 107.50 सहाव्या दिवशी 94.10, सातव्या दिवशी 70.65 कोटी रूपये चित्रपटाने कमावले.
दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची कमाई सुरूच राहिली. आठव्या दिवशी 53.50 कोटी, नवव्या दिवशी 48.10 कोटी, दहाव्या दिवशी 72.90 कोटी रूपयांचा व्यवसाय झाल्याची नोंद आहे. मात्र 12 व्या दिवशी 16 नोव्हेंबरला कमाईचा वेग मंदावल्याचं दिसून येत आहे.
sacnik च्या आकडेवारीचा हवाला देत 12 व्या दिवशी फक्त या चित्रपटाने 18.53 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे भारतातील नेट कलेक्शन 779.13 कोटी रूपयांवर पोहोचले आहे.
भाषेनुसार कमाईचा विचार केला, तर हिंदी आवृत्तीचा सर्वाधिक वाटा आहे. त्यानंतर कन्नड, तमिळ आणि तेलूगू भाषांमधील कमाईचा क्रम लागतो. दुसऱ्या सोमवारच्या घसरणीनंतरही चित्रपटाची एकूण कमाई मोठ्या आकड्यापर्यंत पोहोचली आहे. आता येत्या दिवसांत चित्रपट पुन्हा कमाईचा वेग पकडतो का आणि भारतात 800 कोटींचा टप्पा गाठतो का? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.