AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर 2’बद्दल आमिर खानकडून आता सारवासारव; स्वत:चंच करून घेतलं हसू

मी अद्याप धुरंधर 2 पाहिला नाही, असं म्हणणाऱ्या आमिर खानला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. या ट्रोलिंगनंतर त्याने आता सारवासारव केली आहे. परंतु पुन्हा त्याने असं उत्तर दिलंय, जे वाचून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

'धुरंधर 2'बद्दल आमिर खानकडून आता सारवासारव; स्वत:चंच करून घेतलं हसू
Aamir and RanveerImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 29, 2026 | 2:07 PM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट सध्या जगभरात डंका वाजवतोय. कमाईचा 1000 कोटींचा टप्पा पार केलेला हा चित्रपट अभिनेता आमिर खानने मात्र अद्याप पाहिलेला नाही. ‘धुरंधर 2’ पाहिला नसल्याचं म्हणताच आमिरला सोशल मीडियावर तुफान ट्रोल करण्यात आलं. आता या ट्रोलिंगवर त्याने प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देऊन त्याने पुन्हा एकदा स्वत:चं हसू करून घेतलं आहे. कारण आता त्याने “मी फार क्वचित चित्रपट बघतो”, असं उत्तर देऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘व्हरायटी इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत आमिर म्हणाला, “माझ्याबद्दलची विचित्र गोष्ट म्हणजे मी चित्रपट पाहत नाही. मी वाचक आहे. मी वाचन करतो. लोकांना जेव्हा मोकळा वेळ मिळतो, तेव्हा ते कंटेंट बघतात. एखादा शो किंवा चित्रपट बघतात, मला माझ्या मोकळ्या वेळेत वाचायला आवडतं.”

काय म्हणाला आमिर?

आमिरने पुढे असंही स्पष्ट केलं आहे की त्याला लहानपणापासूनच वाचनाची आवड आहे आणि त्याला चित्रपट बघण्याची परवानगी नव्हती. “मी लहानपणापासून असाच आहे. मला कमी वयातच वाचनाची गोडी लागली. जे चित्रपट मी सातत्याने पाहिले आहेत, ते एकतर ब्लॅक अँड व्हाइट आहे किंवा खूपच जुने आहेत, जे दूरदर्शनवर प्रसारित व्हायचे. मी जुन्या विचारांच्या कुटुंबात वाढलोय आणि माझे पालक चित्रपट बघणं आणि त्यासारख्या गोष्टींबद्दल खूप कठोर होते. आम्हाला चित्रपट बघण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे मला आठवतंय की, जेव्हा मी माझ्या आईला चित्रपट बघू का असं विचारायचो, तेव्हा ती होकार द्यायची, पण रोमँटिक चित्रपट बघण्याची परवानगी नसायची”, असं त्याने सांगितलं.

लहानपणी दिलीप कुमार, अशोक कुमार आणि मराठीत रमेश देव यांचे चित्रपट पाहिल्याचं त्याने पुढे सांगितलं. आमिरने वयाच्या 18 व्या वर्षी फिल्ममेकिंगमध्ये पाऊल ठेवलं आणि असिस्टंट म्हणून तो काम करू लागला होता. चित्रपटसृष्टीत काम करू लागल्यापासून तो आणखी त्यापासून दुरावला गेला. याविषयी आमिर म्हणाला, “काही जण फुटबॉल खेळतात आणि काहीजण फुटबॉलची मॅच बघतात. हेच समर्पक उत्तर आहे. मी चित्रपट बनवतो, पण फार क्वचित मी चित्रपट बघतो. हेच खरं उत्तर आहे. आताचे चित्रपट मी पाहतच नाही. हॉलिवूडमध्ये काय चाललंय हेसुद्धा मला माहीत नसतं. मी माझ्याच विश्वास रमतो. पण मला चित्रपट बघायला आवडत नाही, असं नाही. मला आवडतं.”

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...