AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कारवाई तर झालीच पाहिजे..; मुख्यमंत्र्यांवर भडकली प्रसिद्ध अभिनेत्री

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा हिजाब वाद अजूनही चर्चेत आहे. याप्रकरणी आता भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं ती म्हणाली.

कारवाई तर झालीच पाहिजे..; मुख्यमंत्र्यांवर भडकली प्रसिद्ध अभिनेत्री
nitish kumarImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 24, 2025 | 10:14 PM
Share

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा हिजाब वाद अजूनही चर्चेत आहे. 15 डिसेंबर रोजी आयुष डॉक्टरांना नियुक्ती पत्र देण्याच्या कार्यक्रमात त्यांनी एका महिला डॉक्टरचा हिजाब हटवला होता. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात त्यावरून मोठा वाद झाला होता. कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी या घटनेचा निषेध केला आहे. जावेद अख्तर, झायरा वसीम यांसारख्या कलाकारांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. यादरम्यान आता भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आम्रपाली दुबे हिनेही आपलं मत व्यक्त केलं आहे. हिजाब वादावरून नितीश कुमार यांच्यावर टीका करण्यापासून आम्रपाली दुबेसुद्धा स्वतःला रोखू शकली नाही.

याविषयी आम्रपाली म्हणाली, “माझ्या मते कपडे हा प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक पसंतीचा भाग आहे. पण जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत इतरांच्या भावनांचा सन्मान करणं गरजेचं आहे.” आम्रपाली दुबेच्या आधी ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी सुद्धा या घटनेवर तीव्र शब्दात टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी संबंधित महिलेची विनाशर्त माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर त्यांनी लिहिलं, ‘जे कोणी मला थोडंफार ओळखतात, त्यांना ही गोष्ट माहित आहे की मी पर्दाच्या किती विरोधात आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की नितीश कुमार यांनी एका मुस्लिम महिला डॉक्टरसोबत जे काही केलं, त्याचं मी समर्थन करेन. मी तीव्र शब्दात याची निंदा करतो. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्या महिलेची विनाशर्त माफी मागायला पाहिजे.’

नेमकं प्रकरण काय?

ही घटना 1000 हून अधिक आयुष डॉक्टरांच्या नियुक्ती पत्र वितरण समारंभात घडली होती. डॉ. नुसरत परवीन ही मुस्लीम तरुणी स्टेजवर हिजाब घालून आली होती. तेव्हा तिला नियुक्ती पत्र देताना मुख्यमंत्री नितीश कुमार तिच्या चेहऱ्यावरचा हिजाब ओढताना दिसतात. यामुळे ती तरुणी गोंधळते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. दंगल चित्रपटात झळकलेली अभिनेत्री झायरा वसीमने तिच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहित नितीश कुमार यांनी माफी मागावी अशी मागणी केली.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?