Bigg Boss 20 : बस खूप झालं.. लव्ह गिल-आसिफच्या नात्याची चर्चा, पत्नीने थेट सुनावलं
बिग बॉस 20 मधील आसिफ खान आणि लव गिल यांच्या व्हायरल क्लिप्समुळे त्यांना ट्रोल केले जात आहे. यावर आसिफची पत्नी जेबाने सोशल मीडियावर एक पोस्ट करून ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिले आहे. तिने स्पष्ट केले की, काही सेकंदांच्या क्लिपवरून वैवाहिक जीवनाबद्दल कोणताही निष्कर्ष काढू नये आणि त्यांचे नाते सुरक्षित आहे. तिने प्रेक्षकांना पूर्ण लाइव्ह फीड पाहण्याचे आवाहन केलं,

Bigg Boss 20 Aasif Khan : ‘पंचायत’ फेम अभिनेता आसिफ खान सध्या सलमान खानच्या ‘बिग बॉस 20’ या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. शोच्या लाइव्ह फीडमधून त्याची सह-स्पर्धक लव्ह गिल सोबतचे त्याचे असे काही व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे सोशल मीडिया युजर्सनी त्या दोघांना ट्रोल करण्यास सुरूवात केली. दोघांचं नावही एकत्र जोडलं जाऊ लागलं असून चर्चांना उधाण आलंय. मात्र आता या सर्वानंतर आसिफची पत्नी झेबा हिने एक पोस्ट करत ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
खरंतर, एका क्लिप समोर आली असून त्यामध्ये आसिफ आणि लव्ह गिल एकमेकांना मिठी मारताना दिसले, तर दुसऱ्या क्लिपमध्ये लव्ह ही आसिफच्या मांडीवर बसलेली दिसली. या क्लिप्स पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोक या सिच्युएशनचा आपापल्या परीने अर्थ लावू लागले. एवढेच नव्हे तर, एखादा विवाहित पुरुष दुसऱ्या व्यक्तीच्या इतक्या जवळ कसा जाऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित करत अनेक युजर्सनी आसिफला ट्रोल करण्यासही सुरुवात केली. मात्र या नंतर आता आसिफच्या पत्नीने एक निवेदन जारी केलं आहे. माझं आणि आसिफचं नातं घट्ट आहे. केवळ काही सेकंदांच्या क्लिपवरून आमच्या वैवाहिक जीवनाबाबत कोणताही निष्कर्ष काढू नका, असं आवाहन तिने केलं आहे,
काय म्हणाली आसिफची पत्नी ?
जेबाने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर एक पोस्टकरत निवेदन जारी केलं आहे. “ आसिफबद्दल पूर्णपणे वेगळीच प्रतिमा रंगवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांसाठी, आसिफची पत्नी म्हणून मला हे एकदा स्पष्टपणे आणि मनापासून सांगणं खूप महत्त्वाचं वाटतं. शोमधील काही विशिष्ट प्रसंगांवरून ज्या चर्चा सुरू झाल्या आहेत आणि ज्यांमुळे आमच्या वैवाहिक आयुष्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्याबद्दल मी बोलत्ये. कृपया केवळ सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही क्लिप्स पाहण्याऐवजी, 24×7 (चोवीस तास) चालणारं थेट प्रक्षेपण (live feed) पहा” असं आवाहन तिने या पोस्टमधून केलं आहे.
View this post on Instagram
सगळेच आपापला गेम खेळतायत
” (त्यात) तो माझ्याबद्दल, आमच्या आयुष्याबद्दल आणि आमच्या नात्याबद्दल कितीदा बोलतो, हे तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. व्हिडिओमधील त्या काही सेकंदांत दिसणाऱ्या व्यक्तीपेक्षा, मला माहित असलेला पती तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजेल. आमचं नातं पूर्णपणे सुरक्षित आहे आणि आमच्यातील परस्पर सामंजस्य खूप मजबूत आहे. त्यामुळे कोणत्याही स्पष्टीकरणाची गरज नाही. घरातील प्रत्येकजण आपापला खेळ खेळतोय; त्यांना तो खेळू द्या. पण कृपया, या खेळाचा वापर करून कोणाच्या चारित्र्याबद्दल किंवा वैवाहिक आयुष्याबद्दल निष्कर्ष काढू नका” असं जेबाने या पोस्टमधून ट्रोलर्सना सुनावलंय.
काय आहे व्हायरल व्हिडीओ
सध्या एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यात आसिफ आणि लव्हप्रीत एकाच बेडवर बसलेले दिसले, त्याच्या शेजारी आम्रपालीही बसलेली होती. मात्र, त्यानंतर लव्हप्रीत आसिफच्या मांडीवर जाऊन बसते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या दोघांविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
