AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बसल्या बसल्या उगाच उंगल्या.. ढोल-ताशा पथकावरून वाद चिघळला; श्रुती मराठेनंतर आता अभिनेत्याने विद्याधर जोशींना झापलं

Abhijeet Kelkar Post On Vidyadhar Joshi Kalaawant Dhol Tasha Pathak : अभिनेता अभिजीत केळकर याने आता कलावंत ढोल ताशा पथकाच्या वादात एन्ट्री घेतली आहे.

बसल्या बसल्या उगाच उंगल्या.. ढोल-ताशा पथकावरून वाद चिघळला; श्रुती मराठेनंतर आता अभिनेत्याने विद्याधर जोशींना झापलं
| Updated on: Sep 29, 2026 | 1:07 PM
Share
Vidyadhar Joshi On Kalaawant Dhol Tasha Pathak : मराठी कलाकारांनी एकत्र येऊन २०१४ मध्ये कलावंत ढोल ताशा पथकाची स्थापना केली होती. श्रुती मराठे, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, सौरभ गोखले यांसारखे कलाकार या ढोल ताशा पथकात सहभागी झाले असून त्यांच्या ढोल-ताशा वादनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. यंदाच्या गणेशोत्सवातही कलाकारांच्या वादनाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आता या ढोल वादकांवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी यांनी शेअर केलेल्या एका पोस्टमुळे सगळंच वातावरण तापलं. या पोस्टपेक्षा जास्त चर्चा झाली ती त्या पोस्टवर अभिनेत्री श्रुती मराठेनी केलेल्या कमेंटमुळे. आता या प्रकरणावर अभिनेता अभिनेता अभिजीत केळकरने आपले मत मांडले असून त्यांनी विद्यानंद जोशी यांना चांगलंच सुनावलं आहे.
अभिजीत केळकर काय म्हणाला?
श्रुती आणि विद्याधर जोशी या दोघांच्या पोस्ट कमेंट पाहून अभिजीत केळकर याने सुद्धा आपले मत मांडले आहे.  तो म्हणाला की,”बाप्पा यातल्या एकाही कलाकाराला तू ओळखत नाहीस का? तुझ्याकडे त्यांचे फोन नंबर्स नाही येत का? आणि पुण्यातले, मुंबईतले कलाकार म्हणजे काय असतं!? तुला एवढ्या जेन्युअली हे प्रश्न पडले असते तर त्यांच्यापैकी कोणालाही फोन करून तू हे विचारू शकला असतास किंवा प्रत्यक्ष जाऊनही पाहू शकला असतास….. तू बसल्या बसल्या उगाच उंगल्या करतोस. त्यातून तुला काय साध्य करायचं आहे हे तुलाच माहिती पण एकंदरीतच हल्ली नेहमी उगाच निगेटिव्ह बोलतोस. आता यावर माझ्याशी बोलायला अजिबात फोन करू नकोस मला तुझा राग आलाय.”
काय होती विद्याधर जोशींची पोस्ट?
विद्याधर जोशी यांनी पोस्टमध्ये लिहीले होते की, ‘एक आपली उत्सुकता…1.हे पुण्यातल्या कलाकार पथकातले कलाकार विसर्जनाच्या मिरवणुकीत एकूण किती वेळ ‘ वादन ‘ करतात?? 2. ज्या जोशाने ते रिल्स मधे वाजवताना दिसतात तितक्याच जोशात ते सतत ‘ वादन ‘ करतात का?’
विद्याधर यांच्या कमेंटवर श्रुती मराठेने रिप्लाय करत लिहिले की, ‘बाप्पा…दीड महिना सराव, ११ दिवसांत १४ वेळा वादन आणि शेवटच्या दिवशी जवळपास साडेसात तासांची विसर्जन मिरवणूक एवढं आम्ही करतो. कारण, आम्हाला वादन करायला मनापासून आवडतं. बाकी आमच्या वादनाची शंका असेल, तर पुढच्या वर्षी जरुर या एक दिवस तरी बघायला. तुमचे सगळे प्रश्न सुटतील. घरी बसून फेसबूकवर टाकून प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत बाप्पा. जे लोक आम्हाला लाइव्ह बघतात ते असे प्रश्न फेसबूकवर टाकत नाहीत.’
विद्याधर जोशींची प्रतिक्रिया श्रुतीच्या या कमेंटवर विद्याधर जोशींनी पुन्हा प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले की ‘श्रुती तुझ्या पहिल्या तीन ओळीत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं धन्यवाद. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. प्रत्यक्ष येऊन बघायची काहीही गरज नाही आणि तसेही मला येऊन बघण्यापेक्षा कदाचित वाजवणं आवडेल. कारण वाजवणाऱ्याला त्रास होत नाही. बघणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला तो जास्त होतो, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तुला किंवा इतरांना फक्त रील मध्ये बघितल्यामुळे प्रश्न पडले. प्रत्यक्ष बघितलं नाही हे खरंच आहे. पण एफबीवरती प्रश्न विचारून तू माझ्या प्रश्नाला उत्तर दिलंस, याबद्दल तुझे शतशः आभार. तुला माझा राग आला असेल तर ते योग्यच आहे.’ असं विद्याधर जोशी यांनी म्हटलं आहे.

Follow Us
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन...
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन सहभागी होण्याचे आवाहन
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक...
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय...
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट...
Pune : बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट, अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
Water Level In Dams : पुढील 9 महिने पाण्याची चिंता वाढणार? राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
Sanjay Raut : इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे....
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...