AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर अभिजीत सावंत – गौतमी पाटील यांच्या ‘त्या’ व्हिडीओमागचं गुपित झालं उघड

गायक अभिजीत सावंत आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांचा समुद्र किनाऱ्यावरील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत होता. या व्हिडीओमागचं गुपित आता उघडलं आहे. गौतमी आणि अभिजीत यांचं 'रुपेरी वाळूत' हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अखेर अभिजीत सावंत - गौतमी पाटील यांच्या 'त्या' व्हिडीओमागचं गुपित झालं उघड
Abhijeet Sawant and Gautami PatilImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 27, 2025 | 3:28 PM
Share

काही दिवसांपूर्वी गायक अभिजीत सावंत आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांचा एआय (AI) व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. गौतमी आणि अभिजीतनेच हा व्हिडीओ त्यांच्या अकाऊंटवर शेअर केला होता. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं होतं. ‘सबसे कातील गौतमी पाटील’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौतमी आणि अभिजीतचा रोमँटिक अंदाज पाहून चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता त्या व्हिडिओमागचं खरं कारण समोर आलं आहे. सदाबहार गाण्यांनी प्रेक्षकांना मोहीत करणारा अभिजीत सावंत लवकरच अजून एका नव्या गाण्यामधून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात गाण्याचा ट्विस्ट म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटील देखील अभिजीतसोबत यात काम करताना दिसणार आहे.

2025 वर्षात अभिजीतने अनेक ट्रेंडिंग गाणी गायली आणि प्रेक्षकांना मोहीत केलं. ‘चाल तुरु तुरू’पासून नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘आय पॉपस्टार’मधलं ‘मोहब्बते लुटाऊंगा’चं नवंकोरं जेन-झी व्हर्जन असो.. अभिजीतने त्याच्या सुमधूर आवाजाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. आता त्याचं ‘रुपेरी वाळूत’ हे नवंकोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यात त्याच्यासोबत गौतमी पाटील देखील वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. येत्या 5 डिसेंबरला हे गाणं प्रदर्शित होणार असून आता हे गाणं जुन्या गाण्याचा नवा ट्विस्ट असणार की अजून काही हे जाणून घेण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अभिजीत आणि गौतमी यांचे समुद्रकिनाऱ्यावरील फोटो पाहून आधीच चाहत्यांनी उत्सुकता व्यक्त केली होती. त्यानंतर आता ‘रुपेरी वाळूत’ हे नाव ऐकल्यानंतर ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘रुपेरी वाळूत माडाच्या बनात..’ हे जुनं गाणं तुफान गाजलं होतं. त्यामुळे त्याचं हे नवीन व्हर्जन असेल की आणखी काही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

नृत्यांगना गौतमी पाटीलचा एकही कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला नाही असं होत नाही. त्याचप्रमाणे वाद आणि गौतमी पाटील हेसुद्धा जणू एक समीकरणच बनलं आहे. कधी तिच्या कार्यक्रमात राडे होताना दिसतात, तर कधी पोलीस संरक्षण पुरवू न शकल्याने कार्यक्रम रद्द झाल्याच्याही बातम्या असतात. स्टेज शो करत असतानाच गौतमी काही मराठी चित्रपटांच्या गाण्यांमध्येही झळकली आहे. आता अभिजीतसोबत तिचा हा अल्बम चर्चेत आला आहे.

नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.