ऐश्वर्यासोबत चालण्यास मला भिती वाटते, अभिषेक बच्चन याने सांगितले कारण…

अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या जोडीबद्दल नेहमीच प्रसिद्धी माध्यमात निरनिराळ्या बातम्या येत असतात. त्यांचे खाजगी लाईफ ते सारखे जपत असतात. आता एका मुलाखतीत पत्नी ऐश्वर्याबद्दल अभिषेक मनमोकळेपणे बोलला आहे.

ऐश्वर्यासोबत चालण्यास मला भिती वाटते, अभिषेक बच्चन याने सांगितले कारण...
abhishek and aishwarya
| Updated on: Apr 04, 2026 | 9:57 PM

अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बॉलिवूडचे सर्वात प्रसिद्ध कपल्स पैकी एक आहे. दोघांच्या जोडीला खूपच पसंद केले जाते. हे कपल्स आपल्या वैयक्तिक लाईफला कॅमेऱ्यापासून नेहमीच दूर ठेवत असतात. मात्र, मुलाखतीत अभिषेक नेहमीच त्याच्या पत्नीचे स्तुती आणि प्रेम जाहीर करत असतो.अभिषेकने ऐश्वर्या सोबत रेड कार्पेटवर वॉक करण्यासंदर्भात एक किस्सा सांगितला आहे. ऐश्वर्या सोबत रेड कार्पेटवर चालताना आपल्याला खूप विचित्र आणि अजब वाटते असे अभिषेक याने म्हटले आहे. त्याने नेमके काय सांगितले आहे पाहूयात…

अभिषेकला वाटते कशाची भिती ?

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे पटत नसल्याच्या बातम्या अधून मधून येत असतात. मात्र, त्याने एका मुलाखतीत आपल्या पत्नी सोबत चालताना एक प्रकारचे दडपण येते असे म्हटल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. युट्युबर लिली सिंह याच्या बोलताना अभिषेक बच्चन म्हणाला, तुम्ही माझ्या पत्नीला पाहिले आहे का ? तिला कधी रेड कार्पेटवर पाहिले आहे का ? माझ्यासाठी रेड कार्पेटवर जाणेच सर्वात घाबरवणारी गोष्ट आहे. मला तर तिच्या सोबत रेड कार्पेटवर जायचे असेल तर अधिकच भयानक वाटते. अभिषेक बच्चन यांनी सांगितले की आम्ही सर्व प्रोफेशनल आहोत. या कामात खूप चांगले आहोत. मी तर लाकडाचा ओंडका आहे. मला कळत नाही काय करावे ? हात खिशात ठेवावे ? मला खूप विचित्र वाटते. म्हणून फोटोग्राफर्स नेहमी म्हणतात, ‘वन मोअर स्माईल प्लीज’

अभिषेक बच्चन म्हणाले की एकदा मला एवढे अजब वाटत होते की फोटोग्राफर्स मला म्हणाले की सर आमच्याकडून काय चुक झाली आहे का ? तुम्ही इतके नाराज का दिसत आहात ? यावर मी फक्त सॉरी म्हणालो !

मुलाखतीत अभिषेक बच्चन याला हे देखील विचारले की ऐश्वर्याच्या यशामुळे तुम्हा कधी असुरक्षित वाटते का ? तो म्हणाला की हे माझ्यासाठी घरात आधीही घडले होते. जेव्हा माझ्या आई-वडीलांचे लग्न झाले. तेव्हा माझी आई माझ्या वडीलांपेक्षा मोठी स्टार होती. यामुळे माझ्यासाठी हा अनोखा अनुभव नव्हता. मला असे नाही शिकवले की मला डोमिनेंट व्हायचं आहे. नेहमीच पार्टनरशिपची गोष्ट असते.’

ऐश्वर्या सोबतच्या नात्यावर बोलताना अभिषेक याने सांगितले की मी ऐश्वर्याला माझ्या करियरच्या सुरुवातीपासून ओळखतो. माझा दुसरा चित्रपट तिच्या सोबतच होता. आणि ती एकमेव अभिनेत्री आहे जिच्या सोबत मी सर्वात जास्त काम केले आहे. त्यावेळी आम्ही रिलेशनशिपमध्ये नव्हतो.केवळ एक चांगले मित्र होतो. जेव्हा अखेर एकत्र आलो तर आमची कोर्टशिप, एंगेजमेंट आणि लग्नादरम्यान नेहमी पार्टनरशिपच राहिली. असे कधीच नव्हते की, मी कमावेल आणि तु घर सांभाळायचे. ही गोष्ट कधी चर्चेतही आली नाही.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us