AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू; गाडी डिवाइडरला आदळून झाली पलटी, अवघ्या 30 व्या वर्षी अखेरचा श्वास

जयपूरमधील शिप्रा पथ रोडवर झालेल्या भीषण अपघातात 30 वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्रीचा मृत्यू झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यावरील डिवाइडरला धडकली आणि त्यानंतर उलटली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू; गाडी डिवाइडरला आदळून झाली पलटी, अवघ्या 30 व्या वर्षी अखेरचा श्वास
Jaipur car crashImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 25, 2026 | 8:33 AM
Share

प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल हर्शिल कालियाचा सोमवारी रात्री रस्ते अपघातात मृत्यू झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यावरील डिवाइडरला धडकली आणि त्यानंतर उलटली. ही घटना जयपूरमध्ये घडली असून हर्शिल फक्त 30 वर्षांची होती. जयपूरच्या शिप्रा पथ रोडवर रात्री 11.30 च्या सुमारास हर्शिलचा अपघात झाला. कामावरून घरी परतत असताना हर्शिलचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि ती डिवाइडरला जोरात धडकली. डिवाइडरला धडकल्यानंतर ती कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पलटली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. अपघातानंतर काही स्थानिक हर्शिलच्या मदतीला धावून आले आणि तिला कारमधून बाहेर काढलं. तिला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. हर्शिलच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

या कार अपघातामागचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गाडीचा वेग जास्त होता का किंवा दुसऱ्या गाडीने तिला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला का, याची चौकशी पोलीस करत आहेत. दरम्यान हर्शिलच्या पार्थिवाचं शवविच्छेदन करण्यात आलं असून त्यानंतर ते तिच्या कुटुंबीयांना सोपविण्यात आलं आहे.

अभिनय, सूत्रसंचालन आणि मॉडेलिंग करत हर्शिल तिचं करिअर हळूहळू घडवण्याचा प्रयत्न करत होती. तिने ‘क्राइम नेक्स्ट डोअर’ या वेब सीरिजमध्येही भूमिका साकारली होती. ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम झाली होती. यामध्ये तिने अनुप्रिया गोयंका, यशपाल शर्मा, साहिल वैद आणि वत्सल शेठ यांच्यासोबत काम केलं होतं. अभिनेत्रीशिवाय तिने न्यूज अँकर म्हणूनही काम केलं आहे. हर्शिल विविध राजस्थानी म्युझिक व्हिडीओंमध्येही झळकली होती. गेल्या काही महिन्यांपासून ती मॉडेलिंगवर लक्ष केंद्रीत करत होती.

हर्शिल मूळची जयपूरचीच असून लहानपणापासूनच तिला अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती. शालेय जीवनातही ती विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घ्यायची. इतकंच नव्हे तर दहावी आणि बारावीत तिची सांस्कृतिक मंडळाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. हर्शिलने भातखंडे विद्यापीठात कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं आहे. 2011 मध्ये तिने या शास्त्रीय नृत्य प्रकारात पदवी पूर्ण केली. हर्शिलने विविध सौंदर्यस्पर्धांमध्येही भाग घेतला होता. तिने ‘मिस दिवा राजस्थान 2021’चं विजेतेपद आणि ‘मिस पिंक सिटी’चं उपविजेतेपद पटकावलं होतं. हर्शिलच्या निधनाने तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Follow Us
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?