
घोस्ट रायडरसारखे सुपरहिट चित्रपट करणारे निकोलस केज (Nicolas Cage)नुकताच बाप झाला आहेत. वयाच्या ५८ व्या वर्षी वडील बनलेले निकोलस केजचे हे तिसरे अपत्य आहे. निकोलस केजची 27 वर्षीय पत्नी रिको शिबाता (Riko Shibata) हिने बुधवारी एका मुलीला जन्म दिला. निकोलस केजने गेल्या वर्षीच रिको शिबटासोबत लग्न केले होते. रिको निकोलसपेक्षा 31 वर्षांनी लहान आहे. सोशल मीडिया (Social media) यूजर्स निकोलस केज आणि रिको शिबाटा यांना मुलीच्या जन्माबद्दल शुभेच्छा देत आहेत.
ऑनलाइन मीडिया रिपोर्ट्सनुसार, निकोलस आणि रिकोच्या प्रवक्त्याने बाळाच्या आगमनाची माहिती दिली होती. प्रवक्त्याने सांगितले होते की, निकोलस आणि रिको या जगात त्यांच्या पहिल्या मुलाच्या आगमनामुळे खूप आनंदी आहेत. दोघांनाही मुलगी झाली. सध्या, रिको रुग्णालयात आहे, परंतु आई आणि मुलगी बरे आहेत. हॉलिवूड लाइफने आपल्या एका अहवालात लिहिले आहे की त्यांनी या बातमीची पुष्टी करण्यासाठी निकोलस आणि रिको यांच्याशी संपर्क साधला होता, ज्यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.
रिको शिबाताची ही पहिली मुलगी आहे, परंतु याआधी निकोलसला दोन मुलगे आहेत, जे पहिल्या नात्यातील आहेत. निकोल्सला त्याची मैत्रीण क्रिस्टीना फुल्टनसोबत वेस्टन नावाचा 31 वर्षांचा मुलगा आहे. दुसरा 16 वर्षांचा मुलगा माजी पत्नी अॅलिस किमचा आहे. जेव्हा निकोलसने रिकोशी लग्न केले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले, कारण रिको निकोलसचा मोठा मुलगा वेस्टनपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. निकोलस केजच्या नात्याबद्दल सांगायचे तर, त्याने पाच लग्ने केली आहेत. अॅलिस आणि रिकोच्या आधी निकोलसचे लग्न पॅट्रिशिया, लिसा मेरी प्रेस्ली आणि एरिका कोइके यांच्याशी झाले होते. अॅलिससोबत त्याचे सर्वात मोठे नाते होते. दोघे 2004 ते 2016 पर्यंत एकत्र राहत होते, पण नंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.