AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला तुझ्याकडे लवकर बोलव… अभिनेत्याची धक्कादायक पोस्ट, शेफालीच्या आठवणीत पराग व्याकूळ, म्हणाला, स्वर्गात..

अभिनेत्री शेफाली जरीवाला हिच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. नेहमीच हसत खेळत राहणारी शेफाली अचानक जगाला सोडून गेली. शेफालीच्या निधनानंतर पती आणि अभिनेता पराग त्यागी पुर्णपणे तुटलेला दिसला. आता त्यामध्येच त्याने हैराण करणारी पोस्ट शेअर केलीये.

मला तुझ्याकडे लवकर बोलव... अभिनेत्याची धक्कादायक पोस्ट, शेफालीच्या आठवणीत पराग व्याकूळ, म्हणाला, स्वर्गात..
Shefali Jariwala and Parag Tyagi
| Updated on: Oct 10, 2025 | 8:45 PM
Share

अभिनेत्री शेफाली हिच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. 27 जून रोजी रात्री अचानक शेफालीला पती पराग त्यागी याने रूग्णालयात दाखल केले आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शेफालीच्या निधनानंतर विविध चर्चा रंगल्या. घरी सत्यनारायणाची पूजा ठेवल्याने दिवसभर तिने उपवास पकडला आणि रात्री फ्रीजमधील अन्न गरम करून खाल्ल्यानंतर तिला अचानक त्रास होण्यास सुरूवात झाली आणि काही मिनिटांमध्ये तिने जगाचा निरोप घेतला. शेफालीच्या निधनाचा सर्वात मोठा धक्का जर कोणाला बसला असेल तर तो तिचा पती आणि अभिनेता पराग त्यागी याला बसला. तो क्षणोक्षणी तिच्या आठवणीत भावूक होतो. परागने स्वत:चे केलेले हाल पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला.

आता नुकताच पराग त्यागी याने सोशल मीडियावर काही फोटो शेफालीचे शेअर केले. करवा चाैथच्या दिवशी पत्नीच्या आठवणीत तो चांगलाच व्याकूळ झाला. यासोबतच त्याने एक अत्यंत भावूक अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली, ज्याने चाहते तणावात आली. तुझ्याशिवाय मी श्वास घेऊ शकत नसल्याने त्याने म्हटले. हेच नाही तर मला तुझ्याकडे बोलाव असेलही परागने आपल्या पोस्टमध्ये म्हटल्याचे दिसत आहे.

पराग त्यागी याने शेफालीच्या आठवणीत शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, मी नेहमीच तुझी वाट बघेल. जरी मला स्वर्गात यावे लागले तरीही. जर यदा कदाचित मी तुला शोधू शकलो नाही तर मी तुला विनंती करेल की, तू मला शोध.. मी तुला आपली वचने आणि प्रतिज्ञा आठवण करून देतो की, तू माझी आहेस. माझ्यासाठी काहीच महत्वाचे नाही की, काय घडले. माझे प्रेम फक्त कायमच तू राहशील.

माझ्यासाठी अजिबात महत्वाचे नाही की, ते काय म्हणतील. तू माझ्यासाठी नेहमीच ती राहशील जिचे मी काैतुक करतो. मी फक्त तुझी वाट बघेल. मी तुला तिथेच मिळेल, पण मला आता वाट बघता येत नाहीये. प्लीज जर शक्य असेल तर मला लवकर तिथे बोलाव. मी तुझ्याशिवाय श्वास देखील घेऊ शकत नाहीये. माझी परी..माझी गुंडी…आता पराग त्यागी याची ही पोस्ट पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसलाचे बघायला मिळत आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.