Pawan Kalyan : कधीच लग्न करणार नाही! असं म्हणणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्यानं केली तीन लग्न; सांगितलेली लग्नाची खास गोष्ट

Actor Three Marriage : प्रसिद्ध अभिनेत्यानं तीन लग्न केली असून एका जुन्या मुलाखतीत त्यानं लग्नाबद्दल भाष्य केलेलं.

Pawan Kalyan : कधीच लग्न करणार नाही! असं म्हणणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्यानं केली तीन लग्न; सांगितलेली लग्नाची खास गोष्ट
| Updated on: Nov 10, 2026 | 5:48 PM

अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि त्यांच्या पत्नी अॅना यांनी लग्नाच्या १३ वर्षांनंतर विभक्त होण्याची घोषणा केली आहे. सोमवारी रात्री प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात, या जोडप्यानं म्हटलं आहे की, त्यांनी परस्पर संमतीनं विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या बातमीनंतर, पवन कल्याण यांची २०२३ मधील एक जुनी मुलाखत समोर आली आहे. या मुलाखतीदरम्यान, त्यांनी अभिनेते नंदामुरी बालकृष्ण यांच्या चॅट शोमध्ये आपल्या तीन लग्नांबद्दल आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याभोवती फिरणाऱ्या चर्चांबद्दल मनमोकळेपणानं भाष्य केलं होतं.

पवन कल्याण यांना लग्न करायचं नव्हतं

Loading...

2023 मध्ये, बालकृष्ण यांच्या ‘अनस्टॉपेबल विथ एनबीके’ या शोमध्ये बोलताना पवन कल्याण यांनी खुलासा केला होता की, एक काळ असा होता जेव्हा त्यांना लग्न करायचं नव्हतं आणि योगाचा मार्ग स्वीकारायचा होता. ते म्हणाले, ‘मला अविवाहित राहून योगाचा मार्ग स्वीकारायचा होता. जेव्हा मी माझ्या आयुष्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहतो, तेव्हा मला आश्चर्य वाटतं, हे सर्व खरंच माझ्यासोबत घडलंय का? हे सर्व मीच घडवून आणलंय का? मी कधीच कशाचंही नियोजन केलं नव्हतं.’

आपल्या पहिल्या लग्नाबद्दल बोलताना, पवन यांनी सांगितलं की, ते एक पारंपरिक लग्न होतं, जे त्याच्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांनी ठरवलं होतं. ते म्हणाले की, ‘माझं पहिलं लग्न खूप पारंपरिक होते. ते कुटुंबातील वडीलधाऱ्यांनी ठरवलं होतं. पण प्रत्येक नातं यशस्वी होत नाही. अशा परिस्थितीत जोडपी विभक्त होतात.’

पवन कल्याण यांनी 1997मध्ये नंदिनीशी लग्न केलं. पण, 1999 मध्ये ते विभक्त झाले. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री रेणू देसाई हिच्याशी लग्न केलं. त्यांनी 2009 मध्ये लग्न केलं आणि 2012 मध्ये ते विभक्त झाले.

2013 मध्ये अॅना लेझनेव्हाशी लग्न केलं

अॅना रशियाची आहे आणि तिनं नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहणं पसंत केलं आहे. पवन आणि अॅना यांनी 2013 मध्ये लग्न केलं. त्यांना एक मुलगा आहे. पवन यांनी अॅनाच्या पहिल्या लग्नातील मुलीलाही दत्तक घेतलं आहे.

मुलाखतीदरम्यान, पवन यांनी आपल्या तीन लग्नांबद्दलच्या टीकेलाही उत्तर दिलं. ते म्हणाले की, लोक त्यांच्या तीन लग्नांबद्दल चर्चा करतात. पवन कल्याण म्हणालेले की, ‘लोक माझ्या तीन लग्नांबद्दल बोलत राहतात. मी त्या तिघींशीही एकाच वेळी लग्न केलं नाही, किंवा मी त्यांच्यासोबत एकाच वेळी राहतही नव्हतो. एका व्यक्तीसोबतचं नातं टिकले नाही, म्हणून मला दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करावं लागलं. हे कोणत्याही इच्छेमुळे किंवा आकर्षणामुळे नव्हतं; ते आपोआप घडलं. फक्त वेदना आहेत.’ पवन यांनी पुढे सांगितलं की, त्यांना त्यांच्या पूर्वीच्या नात्यांबद्दल कोणताही पश्चात्ताप किंवा अपराधीपणाची भावना नाही. ते म्हणाले, ‘मला कोणताही अपराधीपणा वाटत नाही. मला वाटतं की कदाचित मी एक प्रसिद्ध चेहरा असल्यामुळे, माझं आयुष्य लोकांसमोर उघड आहे.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us