Aishwarya Rai : ही प्रेग्नंट आहे का ? ऐश्वर्या रायच्या रॅम्पवॉकनंतर ट्रोलर्सनी साधला निशाणा; वाढलेल्या वजनावरूनही सुनावलं

Aishwarya Rai Pregnancy Rumours : अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या रॅम्पवॉकचा व्हिडीओ चांगलाचा व्हायरल झाला आहे. मात्र त्यावरून कौतुक होण्याऐवजी तिला बरंच ट्रोल केलं जात आहे. तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे, काही लोकांनी तर तिच्या वाढलेल्या वजनावरूही अनेक प्रश्न उपस्थित केले.

Aishwarya Rai : ही प्रेग्नंट आहे का ? ऐश्वर्या रायच्या रॅम्पवॉकनंतर ट्रोलर्सनी साधला निशाणा;  वाढलेल्या वजनावरूनही सुनावलं
| Updated on: Sep 29, 2026 | 9:45 PM

बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai ) सध्या मोठ्या पडद्यावर दिसत नसली तरी ती अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित असते, सोशल मीडियावरही ती थोड्यापार प्रमाणात ॲक्टिव्ह आहे. 28 सप्टेंबर रोजी ती पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. ब्लॅक व्हेल्वेट ड्रेसमध्ये तिने रॅम्पवॉक केला. लाल रंगाचे केस आणि त्याच रंगाच्या बोल्ड लिपस्टीकने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. तिचा रॉयल अंदाज पाहण्यासारखा होता. ऐश्वर्या ही बऱ्याच वर्षांपासून लॉरिअल ब्रँडशी निगडीत आहे. तिच्या या रॅम्पवॉकनंतर व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी तिच्या आत्मविश्वासाचं कौतुक केलं. पण अनेकांच लक्ष तिचा लूक आणि तिच्या शरीराकडे होतं. वाढलेल्या वजनामुळे ऐश्वर्याला पुन्हा ट्रोल करण्यात येत असून अनेकांनी तर ती पुन्हा प्रेग्नंट आहे का, असाही सवाल विचारला. पॅरिस फॅशन वीकमधील वॉकनंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे ऐश्वर्या रायला पुन्हा एकदा बॉडी-शेमिंगचा सामना करावा लागत आहे.

या सोहळ्यात ऐश्वर्याशिवाय केंडल जेनर सारख्या मोठ्या सेलिब्रिटींनी देखील रॅम्प वॉक केला. ऐश्वर्याचाही रॅम्प वॉक अनेकांना आवडला खरा, पण सोशल मीडियावर मात्र काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली. तिला पुन्हा बॉडी शेम करण्यात आलं. या फॅशन शोचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ऐश्वर्याचा लूक, तिचं व वाढलेलं वजन यावरून अनेकांनी टोमणे मारले आहेत. तिने अजून वजन का कमी केलं नाही ? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. अनेकांनी तर डायबिटीसची शंका व्यक्त केली असून तिला औषध खाण्याचाही सल्ला दिला.

Loading...

ऐश्वर्याचं वाढलेलं वजन नेटकऱ्यांना पाहवेना

काळ्या ड्रेसमध्ये रॅम्प वॉक करणाऱ्य ऐश्वर्याचा व्हिडीओ समोर आला असून त्यावर विविध कमेंट्स आल्या आहेत. ‘ अरे देवा, हिला ओझेंपिकची गरज आहे’ अशी कमेंट एका युजरने केली. ‘ ही खरंच हट्टी आहे. एअरपोर्ट असो की रनवे, ही (ऐश्वर्या) काही तिची हेअरस्टाइल बदलत नाही’ अशा शब्दांत आणखी एका युजरने तिच्यावर टीका केली. तिसऱ्या युजरने तिला चक्क ‘खरी राखी सावंत’ असं म्हणत निशाणा साधला. ‘ती तिचं वजन का कमी करू शकत नाहीये ?’ असा सवाल आणखी एकाने विचारला. तर तिचा हा ‘रँप वॉक’ म्हणजे जबरदस्तीची फॅशन आहे, अशी बोचरी टीका आणखी एका युजरने कमेंटमधून केली. बऱ्याच काळाने ऐश्वर्याला रँपवर पाहिल्यानंतर एका युजरने तिला ड्रेस डिझायनर बदलण्याचाही सल्ला दिला. एवढंच नव्हे तर, ‘ ती प्रेग्नंट आहे का ?’ असा सवाल आणखी एकाने विचारला.

 

‘पोन्नियन सेल्वन 2’ मध्ये दिसली होती अभिनेत्री

ऐश्वर्या राय कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. अभिषेक बच्चन सोबतच्या नात्यावरही लोकांचं सतत लक्ष असतं. ती अनेकदा, लेक आराध्यासोबत विमानतळावर स्पॉट झाली आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तरती सध्या निवडक प्रोजेक्ट्समध्येच काम करताना दिसते. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पोन्नियन सेल्वन 2’ या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us