AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Esha Deol Divorce : ईशा देओल-भरत तख्तानीच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब, विभक्त झाल्यावर मुलींसोबत कुठे राहणार अभिनेत्री ?

Esha Deol-Bharat Takhtani Seperation : अभिनेत्री ईशा देओल ही पती भरत तख्तानी आणि दोन मुलींसोबत वांद्रे येथील घरात राहत होती. पण आता पतीपासून विभक्त झाल्यानंतर ती कुठे राहणार आहे ?

Esha Deol Divorce : ईशा देओल-भरत तख्तानीच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब, विभक्त झाल्यावर मुलींसोबत कुठे राहणार अभिनेत्री ?
| Updated on: Feb 07, 2024 | 8:06 AM
Share

मुंबई | 7 फेब्रुवारी 2024 : गेल्या काही काळापासून बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी विभक्त होत आहे. टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक हे दोघे वेगळे झाले . त्यानंतर शोएबने तिसरं लग्नही केलं. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील आणखी एका कपलच्या विभक्त होण्याच्या चर्चा सुरू होत्या. बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र आणि ड्रीमगर्ल हेमामालिनी यांची लेक ईशा देओल हिच्या संसारात आलबेल नसल्याचे वृत्त होते. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले. ईशा देओल आणि तिचा पती भरत तख्तानी हे दोघे वेगळे होत आहेत.

12 वर्षांच्या संसारानंतर त्या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. ईशा देओल हिने 2012 साली तिचा बॉयफ्रेंड भरत तख्तानी याच्याशी थाटात विवाह केला होता. मात्र गेल्या काही काळापासून त्यांच्या संसारात वादळ आलं असून आता ते अधिकृतरित्या वेगळे होत आहेत. दोघांनीही परस्पर संमतीने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून तसे एक अधिकृत स्टेटमेंटही जारी केले आहे. त्यांच्या विभक्त होण्याचे कारण भरतचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वी ईशाने भरत तख्तानीसोबत सोशल मीडियावर बरेच फोटो शेअर केले होते. पार्टी, फंक्शन्सलाही ते एकत्र यायचे. मात्र बऱ्याच दिवसांपासून त्यांन एकत्र फोटो पोस्ट करणे बंद केले. अनेकदा पार्टीमध्ये ईशा एकटीच किंवा तिच्या आईसोबत दिसायची. तेव्हापासून इशा-भरतच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली. त्याशिवाय ईशाची आई हेमा मालिनी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या पार्टीतही भरत कुठेही दिसला नाही. या सगळ्यामुळे दोघांमध्ये घटस्फोटाच्या अफवा पसरल्या होत्या.

घटस्फोटानंतर कुठे राहणार ईशा ?

आता खुद्द ईशा आणि भरत यांनी एका निवेदनाद्वारे ते एकमेकांपासून वेगळे होत असल्याचे स्पष्ट केले आहे. या जोडप्याला राध्या आणि मिराया नावाच्या दोन मुलीही आहेत. ईशा पती आणि मुलाींसह वांद्रे येथील घरात राहत होती. पण आता पतीपासून विभक्त घेतल्यानंतर ईशा कुठे राहणार, असा प्रश्न आहे. E24 च्या रिपोर्टनुसार, पतीपासून वेगळे झाल्यानंतर अभिनेत्री तिची आई हेमा मालिनी यांच्या जुहू येथील अनोख्या बंगल्यात शिफ्ट होण्याची तयारी करत आहे.

इंटर स्कूल कॉम्पिटिशनमध्ये झाली पहिली भेट

ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्या प्रेमकथेबद्दल सांगायचे तर, एका आंतरशालेय स्पर्धेत या दोघांची पहिली भेट झाली होती. तिथेच त्या दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...