AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांच्यानंतर जया बच्चन यांनी ठोठावला हायकोर्टाचा दरवाजा, हैराण करणारं कारण समोर

Amitabh Bachchan - Jaya Bachchan : एकापाठोपाठएक सेलिब्रिटी का ठोठावत आहेत हायकोर्टाचा दरवाजा.. अमिताभ बच्चन यांच्यानंतर जया बच्चन यांचा मोठा निर्णय... हैराण करणारं कारण समोर

अमिताभ बच्चन यांच्यानंतर जया बच्चन यांनी ठोठावला हायकोर्टाचा दरवाजा, हैराण करणारं कारण समोर
| Updated on: Nov 08, 2025 | 8:30 AM
Share

Amitabh Bachchan – Jaya Bachchan : गेल्या काही दिवसांमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यामागे कारण देखील फार मोठं आहे.आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि डीपफेक यांचा वापर दिवसागणिक वाढला असून सेलिब्रिटींना याचा वाईट अनुभव येत आहे. आता महानायक अमिताभ बच्चन, अभिनेते अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यानंतर दिग्गज अभिनेत्री जया बच्चन यांनी देखील दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. न्यायमूर्ती मनमीत अरोरा त्यांच्या याचिकेवर सुनावणी करतील.

या याचिकेमुळे जया बच्चन यांना कायदेशीर संरक्षण मिळेल, ज्यामुळे कोणीही त्यांचे नाव, प्रतिमा किंवा आवाज व्यावसायिक फायद्यासाठी वापरण्यापासून रोखले जाईल. पण कोर्टाच्या निर्णयाविरोधात जाऊन जर कोणी असं केल्यास ती व्यक्ती कायद्याच्या कचाट्यात अडकू शकते. सांगायचं झालं तर, आपल्या नावाचा, फोटोचा वाईट वापर होऊ नये यासाठी जया बच्चन यांच्यापूर्वी ऐश्वर्या राय बच्चन, अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, अभिषेक बच्चन, कुमार सानू यांसारख्या सेलिब्रिटींनी दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता.

ऐश्वर्या राय बच्चन हिने सप्टेंबर 2025 मध्ये एक याचिका दाखल करून तिच्या नावाचं, आवाजाचं आणि प्रतिमेचं कमर्शियल फायदे करण्यापासून संरक्षण मागितलं होतं. ही याचिका बनावट वेबसाइट्सच्या विरोधात होती ज्या त्यांचे अधिकृत प्लॅटफॉर्म असल्याचं खोटं भासवत होत्या आणि परवानगीशिवाय अभिनेत्रीचे फोटो वापरूव प्रॉडक्ट विकत होत्या.

अमिताभ – अभिषेक यांना कोर्टाकडून दिलासा…

अभिषेक बच्चनने आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी एक याचिका दाखल केली होती, ज्याचा उद्देश AI-जेनरेटेड अश्लील सामग्री थांबवणे देखील होता. याचिकेत अभिनेत्याने चुकीचं URL काढून टाकण्याची आणि बेकायदेशीर सामग्री असलेल्या वेबसाइट ब्लॉक करण्याची मागणीही केली होती.

2023 मध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नावाचा, प्रतिमेचा आणि आवाजाचा बेकायदेशीर वापर केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा दिला, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गैरवापर रोखला गेला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...