AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भरतनाट्यम सादर करणारी ‘ही’ तरुणी इंटरनेटवर चर्चेत, सौंदर्यासह नृत्य कौशल्याचेही कौतुक!

या चर्चित व्हिडीओमध्ये एक तरुणी घराबाहेर उभी राहून अंगणातील मोकळ्या भागात अभिजात संगीतावर भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य सादर करताना दिसत आहे.

भरतनाट्यम सादर करणारी ‘ही’ तरुणी इंटरनेटवर चर्चेत, सौंदर्यासह नृत्य कौशल्याचेही कौतुक!
| Updated on: Dec 10, 2020 | 1:11 PM
Share

मुंबई : आतापर्यंत आपण इंटरनेटवर बर्‍याच प्रकारचे नृत्य व्हिडीओ पाहिले असतील, परंतु या शास्त्रीय नृत्यांगनेने आपल्या अनोख्या नृत्य शैलीने सर्वांचेच मन जिंकले आहे (Rukmani Vijyakumar Video Viral). तिच्या हा नृत्य व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे. तसेच या व्हिडीओचे व्हुज देखील झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो वेळा पाहिला गेला आहे (Actress Rukmani Vijyakumar’s bharatnatyam dance video gone viral on twitter).

नृत्य मुद्रांनी चाहते घायाळ…

या चर्चित व्हिडीओमध्ये एक तरुणी घराबाहेर उभी राहून अंगणातील मोकळ्या भागात अभिजात संगीतावर भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य सादर करताना दिसत आहे. या नृत्यात तिने तिच्या कठोर नृत्य मुद्रांतून या संगीतामागील छुपी कथा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या सराईत नृत्य मुद्रा नृत्यांगनेच्या अनेक वर्षांच्या सरावाचे वर्णन करीत आहेत. हे नृत्य सादर करताना या तरुणीने भरतनाट्यम वेशभूषा स्टाईलमध्ये साधी गोल्डन साडी परिधान केली आहे. आणि या लूक सोबत तिने साध्या दागिन्यांसह, हलका मेकअप परिधान केला आहे (Actress Rukmani Vijyakumar’s bharatnatyam dance video gone viral on twitter).

(Actress Rukmani Vijyakumar’s bharatnatyam dance video gone viral on twitter)

या तरुणीचा हा नृत्य व्हिडीओ 7 डिसेंबर रोजी वैदेही सिंह नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना यासह कॅप्शनवर लिहिले आहे की, ‘तिच्या डान्स मूव्हजबरोबरच तिची साडी आणि हेअरस्टाईलही खूप सुंदर आहे’.

जगभरातून कौतुकाचा वर्षाव

लोक या डान्स व्हिडीओचा खूप आनंद घेत आहेत. या व्हिडीओवर आतापर्यंत 1 लाख 46 हजार व्हूव झाले आहेत. तसेच, लोक या व्हिडीओवर कमेंट करून या तरुणीच्या नृत्य कौशल्याचे भरभरून कौतुकही करत आहेत.  एका वापरकर्त्याने या व्हिडीओवर कमेंट करत या तरुणीविषयी माहिती दिली आहे. ‘या तरुणीचे नाव रुक्मणी विजयकुमार असून, ती एक प्रसिद्ध अभिनेत्री देखील आहे. आणि ही तरुणी बंगळुरुच्या कोरोमंगला येथे नृत्य वर्ग चालवते’, असे या वापरकर्त्याने म्हटले आहे.

(Actress Rukmani Vijyakumar’s bharatnatyam dance video gone viral on twitter)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.