Salman Khan | डोक्यावर पगडी, किलर अंदाज, पाहा भाईजानचा ‘अंतिम’ फर्स्ट लूक

Salman Khan | डोक्यावर पगडी, किलर अंदाज, पाहा भाईजानचा 'अंतिम' फर्स्ट लूक

सलमान कान या सिनेमात एका शिख पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती होती.

Nupur Chilkulwar

|

Dec 10, 2020 | 10:46 AM

मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा (Salman Khan First Look) आगामी अॅक्शन पॅक्ड सिनेमा ‘अंतिम : द फाइनल ट्रुथ इज आउट’(Antim : The Final Truth Is Out) मधील फर्स्ट लूक पुढे आला आहे. सलमान कान या सिनेमात एका शिख पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती होती. आता हे स्पष्ट झालं आहे. अभिनेता आयुष शर्माने सलमानचा एक व्हिडीओ पोस्ट करत याबाबतची माहिती दिली (Salman Khan First Look).

आयुषने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान पगडी घालून आपल्या डॅशिंग स्वॅगमध्ये चालताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान एका भाजी मार्केटमधून जाताना दिसत आहे. या व्हिडीओला पोस्ट करताना आयुषने कॅप्शन दिलं – “अंतिमची सुरुवात, भाईचा फर्स्ट लूक”

View this post on Instagram

A post shared by Aayush Sharma (@aaysharma)

अंतिमच्या शूटिंगला सुरुवात

सलमान खानने कुठेही काहीही उघड न करता अत्यंत गुपचूपपणे महेश मांजरेकरच्या या गँगस्टर सिनेमाच्या शूटिंगची सुरुवात केली. सलमान खान गेल्या 6 डिसेंबरपासून या सिनेमाचं शूटिंग करत आहेत. या सिनेमात सलमान खान पहिल्यांदा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्मासोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे (Salman Khan First Look).

या सिनेमात आयुष कुख्यात गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात सलमान खान आणि आयुषसोबत निकितन धीरही मुख्य भूमिकेत दिसतील.

सलमान या सिनेमात एका शिख पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. हा अधिकारी त्याच्या हद्दीतील गँगवॉर आणि भू-माफियांना संपवण्याच्या मिशनवर असतो. ऑक्टोबरमध्ये अॅक्शन थ्रिलर ‘राधे’ या सिनेमाची शूटिंग पूर्ण केल्यानंतर त्याने नवीन सिनेमाचं शूटिंग सुरु केलं. पण, त्यासाठी त्याने थोडा वेळ घेतला. कारण, ‘राधे’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान तो क्लीन शेव्हमध्ये दिसला होता. त्यानंतर दाढी वाढवण्यासाठी त्याने काही दिवस वेळ घेतला होता.

Salman Khan First Look

संबंधित बातम्या :

Krrish 4 | ‘क्रिश 4’ मध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत कियारा अडवाणी दिसण्याची शक्यता!

Bigg Boss 14| बिग बॉसच्या घरामध्ये जोरदार हंगामा!

sushant singh rajput | सुशांतचा ‘दिल बेचारा’ चित्रपट अव्वल, ट्विटर इंडियाची यादी जाहिर

Shahid Kapoor | डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘शाहिद कपूर’ लवकरच करणार पदार्पण!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें