AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shahid Kapoor | डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘शाहिद कपूर’ लवकरच करणार पदार्पण!

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आता डिजिटल प्लेटफॉर्मवर पहिले पाऊल लवकरत ठेवणार आहे. कबीर सिंगच्या यशानंतर शाहिद निर्मात्यांची पहिली पसंती ठरली आहे.

Shahid Kapoor | डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'शाहिद कपूर' लवकरच करणार पदार्पण!
| Updated on: Dec 09, 2020 | 1:03 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आता डिजिटल प्लेटफॉर्मवर पहिले पाऊल लवकरत ठेवणार आहे. कबीर सिंगच्या यशानंतर शाहिद निर्मात्यांची पहिली पसंती ठरली आहे. शाहिद सध्या त्याच्या आगामी जर्सी चित्रपटाच्या चित्रीकरणात असून लवकरच करण जोहरच्या चित्रपट योद्धामध्ये दिसणार आहे. पण त्याआधी तो डिजिटल पदार्पण करणार आहे. या प्रोजेक्टला राज निदिमोरू आणि कृष्णा डीके दिग्दर्शित करणार आहेत.(Shahid Kapoor’ to make debut on digital platform soon)

पिंकविलाच्या वृत्तानुसार, योद्धाला शशांक खेतान डायरेक्ट आणि करण जोहर निर्मित करणार आहेत. पण याआधी शाहिद अ‍ॅमेझॉन प्राइमच्या वेब सीरीजची शूटिंग पूर्ण करणार असून हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर प्रोजेक्ट असणार आहे, ज्याची शूटिंग मुंबई आणि दिल्लीमध्ये होणार आहे. रिपोर्ट्सनुसार शाहिदने यापूर्वीच आपल्या डेब्यू प्रोजेक्टच्या शूटिंगचा निर्णय घेतला आहे. त्याचे शूटिंग जानेवारी 2021 मध्ये सुरू होईल. अ‍ॅमेझॉन प्राइमच्या या प्रोजेक्टचे शूटिंग जानेवारी ते एप्रिल या काळात होईल. एप्रिलमध्ये त्याचे शूटिंग संपल्यानंतर शाहिद योद्धाच्या चित्रीकरणाला सुरुवात करेल. शाहिद कपूर अखेर कबीर सिंगमध्ये दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

बॉलिवूड चित्रपट निर्माती एकता कपूरच्या अल्ट बालाजी वेबसीरीज अॅपचा महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित ‘पौरषपूर’चा टीझर नुकतंच प्रदर्शित करण्यात आला. या वेबसीरीजमध्ये झळकणाऱ्या सर्वच कलाकार एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. अभिनेता मिलिंद सोमण याचा या वेबसीरीजमध्ये अनोखा लूक पाहायला मिळत आहे. यामुळे मिलिंद सोमणच्या चाहत्यांसाठी ही वेबसीरीज अनोखी पर्वणी ठरत आहे.

‘पौरषपूर’ या वेबसीरिजसाठी मिलिंद सोमणने नाकात नथ, धोतर, कपाळाला कुंकू, लांब केस, हातात तलावर असा किलिंग लूक परिधान केला आहे. त्याच्या या लूकवर त्याचे चाहते फिदा झाले आहेत. मिलिंद सोमणने या वेबसीरीजमध्ये बोरीस नावाचे पात्र साकारले आहे. बोरीस हे पात्र तृतीयपंथी असल्याचे दाखवण्यात आलं आहे. तर अभिनेत्री शिल्पा शिंदे ही राणी मीरावतीचे पात्र साकारत आहे.

‘पौरषपूर’ ही वेबसीरीज पुरुषी मक्तेदारीविरोधात, महिलांना मिळणारी असमान वागणूक यावर आधारित आहे. भव्यदिव्य सेट, सत्तेसाठी होणारी लढाई, वासना, रक्ताने लाल झालेल्या तलावारी, प्रभावशाली संवाद, पुरुष आणि महिलांमधील असमानता असे अनेक पैलू या सीरीजमधून उलगडणार असल्याचे दिसत आहे. पौरषपूर या वेब सीरीजचे कथानक पुरुषप्रधान संस्कृतीवर आधारित आहे.

संबंधित बातम्या :

Rahul Roy | राहुल रॉय यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, ‘स्ट्रोक’ चित्रपटातून करणार पुनरागमन!

दोन दुकाने, सहा फ्लॅट गहाण ठेवून गरिबांना मदत; गरजवंतांच्या मदतीसाठी सोनू सूदने घेतलं 10 कोटींचं कर्ज

(Shahid Kapoor’ to make debut on digital platform soon)

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...