शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ चित्रपट इंटरनेटवर लिक

अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा चित्रपट कबीर सिंग प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांनी शाहिदच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.

शाहिद कपूरचा 'कबीर सिंग' चित्रपट इंटरनेटवर लिक

मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा चित्रपट कबीर सिंग प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांनी शाहिदच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी शानदार कमाई केली आहे. पण याच दरम्यान चित्रपटाच्या टीमसाठी एक वाईट बातमी समोर आली. 21 जून रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट तमिळ रॉकर्स वेबसाईटच्या माध्यमातून सोशल मीडियावर लीक झाला आहे.

तमिळ रॉकर्सवर यापूर्वीही अनेक प्रदर्शित झालेले चित्रपट लिक करण्यात आले आहेत. मोठ्या आणि छोट्या बजेटचे चित्रपटही या वेबसाईटच्या माध्यमातून लिक झाले आहेत. यामुळे आतापर्यंत अनेक चित्रपटांचे मोठे नुकसान झाले आहे. शाहिद कपूरचा चित्रपट मोठ्या प्रमाणात कमाई करत आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने मोठी कमाई केली. ही कमाई शाहिदच्या करिअरमधील सर्वात मोठी कमाई आहे. मात्र चित्रपट लिक झाल्याने चित्रपटाच्या टीमचे नुकसान होणार आहे.

कबीर सिंग तेलगू चित्रपट अर्जून रेड्डीचा रिमेक आहे. चित्रपटाच्या ओरिजनल व्हर्जनमध्ये विजय दवेरकोंडा आणि शालिनी पांडेने काम केले होते.

“मी चित्रपटासाठी 14 किलो वजन वाढवले होते आणि चित्रपटात मला केस आणि दाढी वाढवण्यासाठी दीड महिना लागला होता”, असं शाहिद कपूर म्हणाला.

कबीर सिंग चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगाने केले होते. संदीपनेच ओरिजनल चित्रपट अर्जून रेड्डी बनवली होती. चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, मुराद खेतानी, कृष्णा कुमार, अश्विन वर्दे आहेत. शाहिदने चित्रपटात एका दारुड्या माणसाची भूमिका साकारली आहे. याशिवाय चित्रपटात कियारा अडवाणीच्या अभिनयाचेही कौतुक केले जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI