‘मिरर सेल्फी’ घेत श्वेता तिवारीने फ्लाँट केली टोन्ड बॉडी, फिटनेसच्या बाबतीत लेकीलाही तगडी स्पर्धा!

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) मागील काही काळापासून सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह झाली होती. ती एकामागून एक तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करुन चाहत्यांना भूरळ घालत असते.

‘मिरर सेल्फी’ घेत श्वेता तिवारीने फ्लाँट केली टोन्ड बॉडी, फिटनेसच्या बाबतीत लेकीलाही तगडी स्पर्धा!
श्वेता तिवारी

मुंबई : छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) मागील काही काळापासून सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह झाली होती. ती एकामागून एक तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करुन चाहत्यांना भूरळ घालत असते. श्वेताने अलीकडेच स्वतःमध्ये जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. आता ती पूर्वीपेक्षा अधिक ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे (Actress Shweta Tiwari flaunt toned body in mirror selfie).

दरम्यान, श्वेता तिवारीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर असा एक फोटो शेअर केला आहे की, तो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. श्वेताने सोशल मीडिया ट्रेंड फॉलो करत ‘मिरर सेल्फी’ शेअर केली आहे. ज्यात ती आपले अब्स दाखवताना दिसत आहे. फोटो शेअर करताना श्वेताने तिच्या फिटनेस ट्रेनरला धन्यवाद म्हटले आहे. कोरोनातून बरी झाल्यानंतर श्वेता तिवारी मागील काही काळ स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेत होती.

पहा श्वेता तिवारीचा फोटो

श्वेताने काही दिवसांपूर्वी तिच्या बर्‍याच फोटोशूट्सचे फोटो शेअर केले होते. श्वेताच्या या फोटोंचे आणि बोल्ड स्टाईलचे कौतुक करताना चाहते अजिबात थकलेले नाहीत.

वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत

श्वेता गेल्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. सध्या तिचे आणि पती अभिनव कोहली (Abhinav kohli) याचे अनेक वाद-विवाद सुरु आहेत. दोघांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही, परंतु दोघेही स्वतंत्र राहत आहेत. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत श्वेताने आपल्या मुलांना खूप त्रास होत असल्याचे सांगितले होते (Actress Shweta Tiwari flaunt toned body in mirror selfie).

श्वेता म्हणाली होती, ‘माझी दोन्ही मुलं नेहमी आनंदी असतात. इतका त्रास सहन करूनही ते कधीही निराश होत नाही. कधीकधी मला आश्चर्य वाटते की ते माझ्यापासून आपल्या भावना लपवत आहेत की काय? पलकने मला तिच्या वडिलांकडून मारहाण होताना पाहिले आहे. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी तिने बरेच काही पाहिले. पलकनी सर्व समस्या पाहिल्या होत्या, जेव्हा पोलीस आमच्या घरी यायचे. त्यांची आई पोलिसांकडे जायची. माझा मुलगा, तो केवळ 4 वर्षांचा आहे आणि त्याला पोलीस आणि न्यायाधीशांबद्दल सर्व माहिती आहे आणि हे सर्व फक्त माझ्यामुळे नाही.’

अभिनवचे श्वेतावर आरोप

त्याच वेळी अभिनवने एका मुलाखतीत म्हटले होते की, त्याने श्वेताला एकदा कानाखाली मारली आणि त्यासाठी तिने दिलगिरीही व्यक्त केली होती. तो म्हणाला होता, ‘श्वेता संपूर्ण कन्फ्यूजन क्रिएट करत आहे, जेणेकरुन मी तिच्याबरोबर घरगुती हिंसाचार केला हे ती सिद्ध करु शकेल, मात्र हे अजिबात खरे नाही. मी कधीही महिलांवर हात उगारत नाही. उलट श्वेतानेच मला काठीने मारहाण केली आहे.’

(Actress Shweta Tiwari flaunt toned body in mirror selfie)

हेही वाचा :

आदेश भाऊजींचे पुन्हा Work From Home, देवमाणूस बेळगावात, झी मराठीच्या मालिकांचं शूट कुठे?

Timeless | संवादफेकीच्या जोरावर मिळाली प्रसिद्धी, त्याच आवाजाने शेवटी सोडली साथ, वाचा अभिनेते राजकुमार यांच्याबद्दल…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI