आदेश भाऊजींचे पुन्हा Work From Home, देवमाणूस बेळगावात, झी मराठीच्या मालिकांचं शूट कुठे?

झी मराठी वाहिनीवरील अनेका मालिकांमध्ये सध्या नवनवे ट्विस्ट अँड टर्न्स येत आहेत. अशातच प्रेक्षकांच्या मनोरंजनात कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी वाहिनीकडून काळजी घेतली जाणार आहे (Zee Marathi Serials Shoot relocated )

आदेश भाऊजींचे पुन्हा Work From Home, देवमाणूस बेळगावात, झी मराठीच्या मालिकांचं शूट कुठे?
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 10:01 AM

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कठोर निर्बंध (Maharashtra Lockdown) लादले आहेत. या काळात मनोरंजनाला ब्रेक लागू नये, यासाठी सर्वच टीव्ही वाहिन्यांकडून खबरदारी घेतली जात आहे. झी मराठी वाहिनीवरील (Zee Marathi) दैनंदिन मालिकांचं शूट आता महाराष्ट्राबाहेर होणार आहे. ‘होम मिनिस्टर’चं शूटिंग आदेश बांदेकर आता पुन्हा आपल्या घरुन करणार आहेत. तर ‘देवमाणूस’ बेळगावला चित्रित केले जाणार आहे. (Zee Marathi Serials Shoot relocated outside Maharashtra over Lockdown)

झी मराठी वाहिनीवरील अनेका मालिकांमध्ये सध्या नवनवे ट्विस्ट अँड टर्न्स येत आहेत. अशातच प्रेक्षकांच्या मनोरंजनात कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी वाहिनीकडून काळजी घेतली जाणार आहे. ‘पाहिले ना मी तुला’ आणि ‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकांचं चित्रीकरण गोव्यात केलं जाणार आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ची टीम दमणला जाणार आहे. तर ‘माझा होशील ना’मधील ब्रह्मे कुटुंब सिल्व्हासाला पोहोचले आहे. नुकतंच त्यांचं मनाली शूटिंग पूर्ण झालं होतं.

साताऱ्यातील वाड्यात होणाऱ्या ‘देवमाणूस’ मालिकेचं शूटिंग आता बेळगावात होईल. तर ‘चला हवा येऊ द्या’ टीमचा सेट जयपूरमध्ये उभारण्यात येणार आहे. ‘रात्रीस खेळ चाले’च्या तिसऱ्या सीझनचं मात्र बरंच शूटिंग झाल्याने एपिसोडची बँक तयार आहे. मालिकांच्या कथानकातही काही बदल होणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

कोणत्या मालिकेचं शूटिंग कुठे?

पाहिले ना मी तुला – गोवा

अग्गंबाई सूनबाई – गोवा

येऊ कशी तशी मी नांदायला – दमण

माझा होशील ना – सिल्व्हासा

देवमाणूस – बेळगाव

चला हवा येऊ द्या – जयपूर

रात्रीस खेळ चाले 3 – एपिसोड बँक

(Zee Marathi Serials Shoot relocated outside Maharashtra over Lockdown)

स्टार प्रवाहच्या मालिकांचंही नवं लोकेशन

सुख म्हणजे नक्की काय असतं – गोवा

रंग माझा वेगळा – गोवा

आई कुठे काय करते – सिल्वासा

स्वाभिमान – सिल्वासा

सहकुटुंब सहपरिवार – सिल्वासा

मुलगी झाली हो – सिल्वासा

सांग तू आहेस का – सिल्वासा

फुलाला सुगंध मातीचा- अहमदाबाद

गेल्या वर्षीच्या अनुभवातून धडा

गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात मनोरंजन विश्वाला मोठा फटका बसला होता. मालिकांचं चित्रिकरण मार्च ते जुलै असे जवळपास चार महिने बंद होतं. त्यामुळे प्रेक्षकांना जुन्या भागांचा आस्वाद घ्यावा लागत होता. याचा पुन्हा फटका बसू नये, यासाठी दरम्यानच्या काळातच अनेक निर्मात्यांनी एपिसोड्सची बँक तयार करुन ठेवली होती. सध्या महाराष्ट्रातील चित्रिकरण थांबताच बहुतांश हिंदी मालिकांनी आपलं बस्तान राज्याबाहेर हलवलं आहे. मराठी मालिकांसाठी हा पर्याय खर्चिक असला, तरी अखंड मनोरंजनाची हमी देण्यासाठी अनेक वाहिन्यांनी पोटाला चिमटा काढत तो स्वीकारला आहे.

संबंधित बातम्या :

अरुंधती सिल्वासा, तर दीपा-कार्तिक गोव्यात, स्टार प्रवाहच्या मालिकांची चित्रिकरणं महाराष्ट्राबाहेर

बावधनच्या बगाड यात्रेतील 134 जण कोरोना पॉझिटिव्ह, साताऱ्यात मालिकांची शूटिंग बंद

(Zee Marathi Serials Shoot relocated outside Maharashtra over Lockdown)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.