अरुंधती सिल्वासा, तर दीपा-कार्तिक गोव्यात, स्टार प्रवाहच्या मालिकांची चित्रिकरणं महाराष्ट्राबाहेर

प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मनोरंजनात कुठलाही व्यत्यय येऊ नये, याची काळजी स्टार प्रवाह वाहिनीकडून घेतली जाणार आहे. (Star Pravah Marathi Serial Shoot)

अरुंधती सिल्वासा, तर दीपा-कार्तिक गोव्यात, स्टार प्रवाहच्या मालिकांची चित्रिकरणं महाराष्ट्राबाहेर
मराठी मालिकांचं शूटिंग राज्याबाहेर होणार
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 3:33 PM

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) कठोर निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. राज्याची वाटचाल पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या (Corona Lockdown) दिशेने होत आहे. अशात मनोरंजनाला ब्रेक लागू नये, यासाठी वाहिन्यांकडून खबरदारी घेतली जात आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravah) दैनंदिन मालिकांचं शूट आता महाराष्ट्राबाहेर होणार आहे. (Star Pravah Marathi Serial Shoot relocated outside Maharashtra over Lockdown)

स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका गेल्या अनेक आठवड्यांपासून टॉपवर आहेत. बहुतांश आठवडे स्टार प्रवाहवरील वाहिन्याच पहिल्या पाचामध्ये स्थान मिळवत आहेत. आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा, स्वाभिमान यासारख्या बहुतांश मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मनोरंजनात कुठलाही व्यत्यय येऊ नये, याची काळजी स्टार प्रवाह वाहिनीकडून घेतली जाणार आहे.

व्यक्तिरेखांची नवी घरं आणि नवा परिसर?

‘आई कुठे काय करते!’, ‘स्वाभिमान’, ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘मुलगी झाली हो’, ‘सांग तू आहेस का?’ या पाचही मालिकांचं शूटिंग आता गुजरात बॉर्डरवरील सिल्वासामध्ये होणार आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचं शूट अहमदाबादेत होणार आहे. तर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ आणि ‘रंग माझा वेगळा’ या मालिकांची चित्रिकरणं गोव्याला हलवण्यात आली आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना आता त्यांच्या लाडक्या व्यक्तिरेखांची नवी घरं आणि परिसर पाहायला मिळेल. त्या अनुषंगाने कथानकातही काही बदल होणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

कोणत्या मालिकेचं शूटिंग कुठे?

सुख म्हणजे नक्की काय असतं – गोवा

रंग माझा वेगळा – गोवा

आई कुठे काय करते – सिल्वासा

स्वाभिमान – सिल्वासा

(Star Pravah Marathi Serial Shoot)

सहकुटुंब सहपरिवार – सिल्वासा

मुलगी झाली हो – सिल्वासा

सांग तू आहेस का – सिल्वासा

फुलाला सुगंध मातीचा- अहमदाबाद

गेल्या वर्षीच्या अनुभवातून धडा

गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात मनोरंजन विश्वाला मोठा फटका बसला होता. मालिकांचं चित्रिकरण मार्च ते जुलै असे जवळपास चार महिने बंद होतं. त्यामुळे प्रेक्षकांना जुन्या भागांचा आस्वाद घ्यावा लागत होता. याचा पुन्हा फटका बसू नये, यासाठी दरम्यानच्या काळातच अनेक निर्मात्यांनी एपिसोड्सची बँक तयार करुन ठेवली होती. सध्या महाराष्ट्रातील चित्रिकरण थांबताच बहुतांश हिंदी मालिकांनी आपलं बस्तान राज्याबाहेर हलवलं आहे. मराठी मालिकांसाठी हा पर्याय खर्चिक असला, तरी अखंड मनोरंजनाची हमी देण्यासाठी अनेक वाहिन्यांनी पोटाला चिमटा काढत तो स्वीकारला आहे.

संबंधित बातम्या :

Star Pravah Parivaar | स्टार प्रवाह परिवारमध्ये अरुंधती, माऊ, जयदीप सर्वोत्तम; विजेत्यांची संपूर्ण यादी

बावधनच्या बगाड यात्रेतील 134 जण कोरोना पॉझिटिव्ह, साताऱ्यात मालिकांची शूटिंग बंद

(Star Pravah Marathi Serial Shoot relocated outside Maharashtra over Lockdown)

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.