AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्री 9 वर्षांनी मोठ्या अन् दोन मुलांच्या वडिलांच्या प्रेमात पडली; लग्नानंतर करिअर थांबलं, पण मुलगी मात्र बॉलिवूडमधली टॉप अभिनेत्री

एक अशी अभिनेत्री जिने बॉलिवूडमधील एका विवाहित आणि दोन मुलांचे वडील असलेल्या एका प्रसिद्ध चित्रपट निर्माते तथा दिग्दर्शकाशी लग्न केलं. त्यानंतर तिला टीकेला सोमारं जावं लागलं. मात्र आज या अभिनेत्रीची मुलगी देखील बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

अभिनेत्री 9 वर्षांनी मोठ्या अन् दोन मुलांच्या वडिलांच्या प्रेमात पडली; लग्नानंतर करिअर थांबलं, पण मुलगी मात्र बॉलिवूडमधली टॉप अभिनेत्री
Actress Soni RazdanImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Oct 25, 2025 | 2:27 PM
Share

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हे चित्रपटांपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिलेले आहेत. तसेच काही अभिनेत्रींचे लग्न हे जास्त चर्चेत राहिलं आहे. अशीच एक बॉलिवूडमधील अभिनेत्री आहे जी तिच्या चित्रपटांपेक्षाही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिलं आहे. कारण ही अभिनेत्री दोन मुलांचे वडील असलेल्या प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली आणि लग्न केलं. त्यामुळे या अभिनेत्रीला अनेक काळ टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं.

अभिनेत्री विवाहित निर्माते आणि दिग्दर्शकाच्या प्रेमात

ही अभिनेत्री म्हणजे सोनी राजदान. सोनी राजदान यांनी 80 आणि 90 च्या दशकात आपल्या उत्तम अभिनयाने नाव कमावलं. सोनीने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले, सोनी यांनी प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याशी लग्न केलं. भट्ट आधीच विवाहित होते आणि त्यांना दोन मुले होती. महेश भट्ट यांचे पहिले लग्न लोरेन ब्राइटशी झाले होते, ज्यांना किरण भट्ट म्हणूनही ओळखले जाते, त्यांच्यापासून पूजा भट्ट आणि राहुल भट्ट ही दोन मुले आहेत. तथापि, काही वर्षांनंतर सोनी यांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केलं. महेश भट्टशी लग्न केल्यानंतर त्या अभिनयापासून दूरच राहिल्या.

अभिनेत्रीचे वडील काश्मिरी पंडित होते

सोनी राजदान यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1956 रोजी इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे झाला. त्यांचे वडील काश्मिरी पंडित होते आणि आई जर्मन-ब्रिटिश होती. सोनी राजदान यांनी त्यांच्या दोन्ही पालकांच्या संस्कृती स्वीकारल्या आणि नंतर महेश भट्ट यांच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला. महेश भट्ट हे सोनीपेक्षा नऊ वर्षांनी मोठे आहेत. दरम्यान सोनी आणि महेश भट्ट यांना आलिया आणि शाहीन या दोन मुली आहेत. आलिया आज बॉलिवूडमधील टॉप अभिनेंत्रीपैकी एक आहे. तिची बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळखं आहे.

इंग्रजी रंगभूमीपासून अभिनय कारकिर्दीला सुरुवात

सोनी राजदानला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिने इंग्रजी रंगभूमीतून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर “द कलेक्टर” या इंग्रजी चित्रपटात काम केले. 1970 च्या दशकात प्रदर्शित झालेला हा चित्रपट तितकासा यशस्वी झाला नाही. 1981 मध्ये, सोनीने अँग्लो-इंडियन्सच्या दुर्दशेचे चित्रण करणाऱ्या “36 चौरंगी लेन” या बंगाली चित्रपटात काम केले. त्याच वर्षी, तिने “अहिस्ता अहिस्ता” या तिच्या पहिल्या चित्रपटात दीपाची भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हीट चित्रपट दिले आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...