अभिनेत्रीला आईने नको तसं वागवलं… लग्नाआधी 2 मुलींचा जन्म… नवऱ्याने सोडली साथ… मुलींनी देखील फिरवली पाठ

Actress Life: अभिनेत्रीच्या आयुष्यातील आनंद क्षणीक होता... आईने नको तसं वागवलं... श्रीमंत व्यक्तीच्या प्रेमाच्या जाळ्यात... लग्नाआधीच दोन मुलींचा जन्म... अखेर नवऱ्याने सोडली साथ आणि मुलींनी देखील फिरवली पाठ...

अभिनेत्रीला आईने नको तसं वागवलं... लग्नाआधी 2 मुलींचा जन्म... नवऱ्याने सोडली साथ... मुलींनी देखील फिरवली पाठ
| Updated on: Mar 08, 2026 | 12:37 PM

Actress Life: बॉलिवूडची अशी सुंदर अभिनेत्री, तिचं संपूर्ण आयुष्य खडतर होतं… कळत नव्हतं तेव्हाच वडिलांना साथ सोडली… अशात कुटुंबाची जबाबदारी म्हणून अभिनेत्रीसा लहानपणी बालकलाकार म्हणून काम करावं लागलं… पण असं असताना देखील आईने देखील नको तशी वागणूक दिली. त्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाली. पण लग्नाच्या आधीच अभिनेत्रीने दोन मुलींना जन्म दिला.. पण पतीने देखील आयुष्यभर साथ दिली नाही. नवऱ्याने साथ सोडल्यानंतर मुलींनी देखील पाठ फिरवली…

सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री सारिका आहे. 1967 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हमराज’ मधून तिने बालकलाकार म्हणून काम केलं. त्यानंतर ‘रजिया सुल्तान’, ‘बडे दिल वाले’, ‘कैसे कैसे लोग’, ‘नास्तिक’ आणि ‘मैं कातिल हूं’, यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. लहानपणीच अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. अभिनेत्रीचं सर्वच स्तरातून कौतुक झालं, पण तिची आई तिला त्रास देत राहिली. अभिनेत्रीच्या शूटिंगच्या पैशातून आईने पाच फ्लॅट खरेदी केले. सारिकाला जेव्हा कळले की एकही फ्लॅट तिच्या नावावर नाही, तेव्हा ती घर सोडून गेली.

आईने फसवणूक केल्यानंतर देखील तिने मागे वळून पाहिलं नाही. ती संघर्ष करतच राहिली… अनेक मोठ्या सिनेमांमध्ये तिने काम केलं. बॉलिवूडमझ्ये सारिका यशाच्या शिखरावर पोहोचली… दरम्यान, सारिका हिची ओळख अभिनेते कमल हासन यांच्यासोबत झाली. पहिली भेट आणि मैत्री प्रेमात कशी बदलली हे दोघांना देखील कळलं नाही. तेव्हा कमल यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरलेला.

पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर सारिका आणि कमल यांनी एकत्र राहण्यास सुरुवात केली. सारिका हिने लग्नाआधी दोन मुलींना जन्म देखील दिला… अखेर कमल आणि सारिका यांनी 1988 मध्ये लग्न केलं… पण दोघांचं नात फार काळ टिकलं नाही. दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 16 वर्षांनंतर म्हणजे 2004 मध्ये सारिका आणि कमल यांनी घटस्फोटाची घोषणा केली..

घटस्फोटानंतर सारिकाच्या अडचणी वाढल्या. सिमी ग्रेवालला दिलेल्या मुलाखतीत सारिकाने स्पष्ट केलेलं की, घटस्फोटानंतर जेव्हा ती घराबाहेर पडली तेव्हा तिच्याकडे फक्त 60 रुपये आणि एक कार होती. अभिनेत्री म्हणाली, ‘मला माहिती नव्हतं मी किठु जाईल… अंघोळ कुठे करेल… अखेर मी माझ्या मैत्रिणींच्या घरी गेली आणि रात्र माझ्या कारमध्ये राहिली..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

Follow Us