
मुंबई : सध्या एक चित्रपट प्रचंड चर्चेत आहे तो म्हणजे द केरळ स्टोरी. द केरळ स्टोरी (The Kerala Story) चित्रपटाचे टिझर रिलीज झाल्यापासूनच मोठ्या वादाला तोंड फुटले होते. अनेकांनी थेट या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. इतकेच काय तर दोन राज्यांमध्ये थेट चित्रपटावर बंदी घातली गेली. अनेकांनी चित्रपटाच्या विरोधात थेट कोर्टात धाव घेतली. मोठ्या विरोधानंतर हा चित्रपट (Movie) 5 मे रोजी रिलीज झालाय. विशेष म्हणजे आता या चित्रपटाला रिलीज होऊन जवळपास महिना होईल. इतका मोठा विरोध असताना हा चित्रपट फार काही धमाका बाॅक्स आॅफिसवर (Box office) करेल, असे अजिबात कोणाला वाटले नाही. मात्र, याच्या सर्वकाही उलटे घडले.
द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज झालेल्याच दिवशी चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाका केला आणि जबरदस्त अशी कामगिरी केली. सर्वांना वाटत होते की, इतका मोठा विरोध चित्रपटाला झाल्याने प्रेक्षक या चित्रपटाकडे पाठ फिरवतील. मात्र, असे अजिबातच झाले नाही आणि या चित्रपटाने तूफान अशी कामगिरी केलीये.
विशेष म्हणजे अजूनही बाॅक्स आॅफिसवर द केरळ स्टोरी चित्रपटाचा जलवा हा बघायला मिळतोय. द केरळ स्टोरी चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे महिला केंद्रित असलेला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट द केरळ स्टोरी हाच ठरलाय. यंदाच्या वर्षीचा दुसऱ्या क्रमाकांवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील द केरळ स्टोरी हाच ठरलाय.
द केरळ स्टोरी चित्रपटात अदा शर्मा ही महत्वाच्या भूमिकेत आहे. नुकताच अदा शर्मा हिने काही फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अदा शर्मा हिने जे फोटो शेअर केले आहे ते फोटो द केरळ स्टोरी चित्रपटाच्या शूटिंगवेळीचे आहेत. चित्रपटाच्या शूटिंगवेळी अदा शर्मा हिच्या चेहऱ्यावर दुखापत झाल्याचे देखील दिसत आहे.
हे फोटो शेअर करताना अदा शर्मा हिने लिहिले की, सनकिस्डनंतर आणि अगोदरपासून. अशा फाटलेल्या ओठांचे रहस्य… उणे 16 अंश तापमानात 40 तास निर्जलीकरण. गाद्या खाली पडण्याचा सराव करण्यासाठी ठेवल्या होत्या… पण आम्ही ते वापरले नाही. केसांमध्ये मुठभर खोबरेल तेल, घट्ट पोनी, पिन आणि गजरा…आता अदा शर्मा हिची पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत असून चाहत्यांनी या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करण्यास सुरूवात केलीये.