योगेश कदम ठरले खेडचे ‘धुरंधर’… रणनीती आणि डावपेचामुळे महायुतीची एक हाती सत्ता; ठाकरेंच्या सेनेला भोपळा
Maharashtra Nagar Palika Election Results : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल लागले असून महायुतीने धमाकेदार कामगिरी केली. खेडमध्ये योगेश कदम यांनी महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला आहे.

गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने खेड नगरपरिषद निवडणुकीत 21-0 असा ऐतिहासिक व एकतर्फी विजय मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. या निकालात महायुतीने सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर खेडमध्ये कोणाची सत्ता येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, निकाल जाहीर होताच महायुतीने 21-0 असा क्लीन स्वीप करत विरोधकांना नामोहरम केले. या निकालात महाविकास आघाडीला खातेही उघडता आले नाही. या घवघवीत विजयामुळे माधवी भुटाला या नगराध्यक्षपदावर विराजमान होणार आहेत. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने काैतुकास्पद कामगिरी नक्कीच केली आहे.
महायुतीने खेड नगरपरिषदेत मारली मोठी मुसंडी
जनतेने दिलेल्या या स्पष्ट कौलातून विकासाभिमुख नेतृत्वावरचा विश्वास अधोरेखित झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे 17 उमेदवार विजयी तर भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले. 21-0 हा निकाल खेडच्या राजकारणात मैलाचा दगड ठरणारा असून महायुतीच्या एकसंध नेतृत्वावर जनतेचा ठाम विश्वास दर्शवतो. गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी खेडमध्ये मोठा विजय खेचून आणला आहे.
महायुतीने 21-0 ने मिळवला जोरदार विजय
राज्यातील नगरपरिषद आणि पंचायतींचे निकाल जवळपास लागले असून राज्यात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष या निवडणुकीत ठरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट आहे. महायुतीने जोरदार मुसंडी नगरपरिषद निवडणुकीमध्ये मारली आहे. चिपळूणमध्ये शुभम पिसे यांचा एका मताने विजय झाला असून ही निवडणूक राज्यभर चर्चेत आहे. आळंदी नगरपरिषदेमध्ये भाजप विजयी झाले.
खेड नगरपरिषदेत फक्त महायुतीचीच हवा
सासवड नगराध्यक्ष पदाच्या भाजपाच्या आनंदी जगताप विजयी झाल्या आहेत. भाजपा नगरसेवक 13 उमेदवार विजयीशिवसेना शिंदे गटाचे 9 उमेदवार विजयी झाले आहेत. शिंदेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शालिनी संजय खातळे या 5870 मतांनी विजयी झाल्या. भाजपच्या मधुमालती मेंद्रे यांचा पराभव झाला. निवडून आलेले 21 नगरसेवक शिवसेना शिंदे गट 5, राष्ट्रवादी अजित पवार 13, उबाठा 1 आणि भाजपा 2 याप्रमाणे.
