AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धुरंधर पहा, पण आम्हालाही संधी द्या..; फ्लॉप चित्रपटाच्या हिरोची विनंती; म्हणाला “आम्ही कुठे जायचं?”

बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेल्या या चित्रपटाच्या हिरोने प्रेक्षकांसमोर ही विनंती केली आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर स्ट्रीम होत आहे. या चित्रपटात अभिनेते संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूरने मुख्य भूमिका साकारली होती.

धुरंधर पहा, पण आम्हालाही संधी द्या..; फ्लॉप चित्रपटाच्या हिरोची विनंती; म्हणाला आम्ही कुठे जायचं?
DhurandharImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 27, 2026 | 12:45 PM
Share

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड्स मोडले. धुरंधरच्या यशासमोर इतर सर्व चित्रपट लहान वाटू लागले. ‘धुरंधर’नंतर सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’नेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. परंतु या मोठ्या चित्रपटांनी थिएटरमध्ये आलेल्या छोट्या आणि कमी बजेटच्या चित्रपटांचा खेळ खल्लास केला. काही आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या शनाया कपूर आणि आदर्श गौरव यांच्या ‘तू या मैं’ या चित्रपटाने त्याचा चांगलाच अनुभव घेतला आहे. या चित्रपटाची कमाई अपेक्षेपेक्षा खूपच कमी झाली. आता त्यावर चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या आदर्शने आपलं मत मांडलं आहे. लोकांनी चित्रपट थेट नाकारण्यापेक्षा आधी एक संधी तरी द्यावी, असं तो म्हणाला.

याविषयी ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत आदर्श म्हणाला, “मला असं वाटतं अनेकजण चित्रपट न पाहता किंवा त्याविषयी नीट विचार न करताच फॅशन म्हणून शिव्या घालतात. जर चित्रपट पाहिला असेल आणि तरी तो आवडला नसेल तर आमचा वेळ वाया घालवला म्हणून आम्हाला खुशाल शिव्या द्या. परंतु कमीत कमी आधी तो पाहून तरी घ्या. आम्ही काय मेहनत केली आहे, ते तरी समजून घ्या. आमचा चित्रपट रिमेक असला तरी लेखकांनी अत्यंत समजुतदारपणे स्क्रीप्ट लिहिली आणि बदलली आहे. ज्या लोकांनी हा चित्रपट पाहिला, त्यांनी मला सांगितलं की हा अजिबात मूळ चित्रपटासारखा नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी एक संधी द्यावी आणि हा चित्रपट पहावा, असं मला वाटतं. छोटी व्यावसायिक चित्रपटेसुद्धा प्रेक्षकांनी पहावीत.”

कोविडनंतर प्रेक्षकांच्या चित्रपटांबद्दलच्या निवडी बऱ्याच बदलल्याचंही मत आदर्शने यावेळी मांडलं. याविषयी तो पुढे म्हणाला, “लोकांनी मोठमोठ्या चित्रपटांसोबतच छोटी आणि कमी बजेटची चित्रपटेही पहावीत. जेणेकरून त्यातील कलाकारांना आणखी एक संधी मिळू शकेल. कोविडनंतर लोक फक्त मोठे, ॲक्शन चित्रपटच थिएटरमध्ये बघायला जात आहेत. त्यांनी ॲनिमल, बॉर्डर 2, धुरंधर यांसारखे चित्रपट पहावेत. परंतु त्याचसोबत यासारख्या छोट्या-मोठ्या चित्रपटांसाठीही प्रेक्षकांनी थिएटरमध्ये काही संख्येने तरी यावं. मी असं म्हणत नाही की अशा चित्रपटांनी खूप पैसा कमवावा, परंतु जर सतत मोठं नुकसान होत असेल तर, निर्माते नवीन कथांसोबत प्रयोग करणंच सोडून देतील. मग फक्त मोठ्या स्टार्सचे मोठेच चित्रपट पाहिले जातील. मग माझ्यासारखे कलाकार कुठे जातील? नवोदित कलाकार कुठे जातील?”

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...