Akshara Singh: अंजली अरोरानंतर आता अक्षरा सिंहचा MMS लीक? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 17, 2022 | 6:21 PM

हा अक्षराचा व्हिडीओ आहे की मॉर्फ केलेला व्हिडीओ आहे, हे स्पष्ट होऊ शकलं नाही. युट्यूबवरील अनेक युजर्स हा कथित व्हिडिओ अक्षराचा असल्याचा दावा करत आहेत.

Akshara Singh: अंजली अरोरानंतर आता अक्षरा सिंहचा MMS लीक? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Akshara Singh: अंजली अरोरानंतर आता अक्षरा सिंहचा MMS लीक?
Image Credit source: Instagram

‘कच्चा बदाम’ या गाण्यावरील व्हिडीओमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री अंजली अरोराचा (Anjali Arora) एमएमएस व्हिडीओ लीक झाल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर आता भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहचाही (Akshara Singh) MMS व्हिडीओ लीक झाल्याचं कळतंय. अक्षरा ही फक्त यूपी बिहारमध्येच नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे. अभिनयासोबतच तिच्या गायनाचेही असंख्य चाहते आहेत. अक्षराची गाणी अनेकदा युट्यूबवर ट्रेंडिंग लिस्टमध्ये असतात. आता अक्षराचं नाव एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अक्षरा सिंह नावाने हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

हा अक्षराचा व्हिडीओ आहे की मॉर्फ केलेला व्हिडीओ आहे, हे स्पष्ट होऊ शकलं नाही. युट्यूबवरील अनेक युजर्स हा कथित व्हिडिओ अक्षराचा असल्याचा दावा करत आहेत. या व्हिडिओवर अद्याप तिची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अक्षराचे चाहते आणि ट्रोलर्स यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आहे. एकीकडे ट्रोलर्स अक्षरावर निशाणा साधत आहेत, तर दुसरीकडे तिचे चाहते हा व्हिडिओ फेक असल्याचं म्हणत आहेत. यासोबतच ते अक्षरालाही समोर येऊन हे स्पष्ट करण्याची विनंती करत आहेत.

 

हे सुद्धा वाचा

View this post on Instagram

 

A post shared by Akshara Singh (@singhakshara)

याआधीही अनेक भोजपुरी सेलिब्रिटींचे कथित एमएमएस व्हिडिओ लीक झाल्याचा दावा करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच भोजपुरी गायिका शिल्पी राजचा एक कथित एमएमएस लीक झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र त्यावर प्रतिक्रिया देत शिल्पीने तो व्हिडीओ बनावट असल्याचं स्पष्ट केलं होतं. याशिवाय अभिनेत्री काजल राघवानीवरही असाच आरोप करण्यात आला होता. मात्र नंतर व्हिडिओत दिसणारी मुलगी काजल नसल्याचं स्पष्ट झालं.

अक्षरा ही भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आतापर्यंत अनेक भोजपुरी सुपरस्टार्ससोबत चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ती बिग बॉस या लोकप्रिय शोमध्येही दिसली होती. काही दिवसांपूर्वी तिचा आमिर खानसोबतचा डान्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI