AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा भन्नाट दसरा स्पेशल डान्स; तब्बल 3.2 मिलियन व्ह्यूज, मुलाच्या गर्लफ्रेंडची कमेंट चर्चेत

यापूर्वीही ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या डान्स व्हिडीओंवरून सोशल मीडियावर चर्चा झाली आहे. काही वेळा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. मात्र, दोघांनीही आपल्याला आवडत असलेल्या गोष्टी करण्यावर भर दिला आहे.

ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा भन्नाट दसरा स्पेशल डान्स; तब्बल 3.2 मिलियन व्ह्यूज, मुलाच्या गर्लफ्रेंडची कमेंट चर्चेत
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकरImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 21, 2026 | 1:39 PM
Share

Aishwaya-Avinash Narkar: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेते अविनाश नारकर. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या जोडीने सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यांचे डान्स व्हिडीओ, फिटनेस रील्स आणि एकमेकांसोबतचे मजेशीर क्षण नेहमीच चर्चेत असतात. आता दसऱ्यानिमित्त या जोडीने शेअर केलेल्या खास डान्स रीलने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या काही तासांत या व्हिडीओला तब्बल 3.2 मिलियन म्हणजेच जवळपास 32 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या या धमाकेदार डान्सवर मुलगा अमेय नारकरची गर्लफ्रेंड ईशा संजय हिनेही खास कमेंट केली आहे.

दसऱ्याच्या निमित्ताने ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी ‘गुलाल उधळला देवा तुझा छबिना चालला’ या गाण्यावर भन्नाट डान्स केला. पारंपरिक उत्साह आणि आधुनिक स्टाइल यांचा मेळ साधत दोघांनीही आपल्या नृत्यकौशल्याची झलक दाखवली. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, गाण्याच्या तालावर धरलेला ठेका आणि एकमेकांसोबतची केमिस्ट्री चाहत्यांना विशेष भावली. ऐश्वर्या यांनी या व्हिडीओसोबत दसरा पूर्ण उत्साहात साजरा केल्याच्या आशयाचं कॅप्शनही दिलं. त्यानंतर चाहत्यांनी या रीलवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. अवघ्या 15 तासांत 3.2 मिलियन म्हणजेच 32 लाख व्ह्यूज आणि सुमारे 1 लाख 37 हजार लाइक्स मिळाल्याने हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला.

पहा व्हिडीओ-

ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या डान्स व्हिडीओवर अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि ओमकार जाधव यांच्यासह अनेकांनी त्यांच्या उत्साहाचं कौतुक केलं. मात्र, सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते त्यांच्या मुलाची गर्लफ्रेंड ईशा संजय हिच्या कमेंटने. ईशाने या व्हिडीओवर ‘काय एनर्जी आहे’ अशी कमेंट केली. तिच्या या प्रतिक्रियेमुळे नारकर दाम्पत्याच्या डान्सची चर्चा आणखी रंगली. दोघांचा उत्साह पाहून चाहत्यांनाही त्यांचं कौतुक करण्याचा मोह आवरला नाही.

ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांची खासियत म्हणजे त्यांचा फिटनेस आणि कोणताही डान्स करताना दिसणारा उत्साह. मराठी आणि हिंदी गाण्यांवर ते नियमितपणे रील्स बनवतात. त्यांच्या व्हिडीओमध्ये नृत्याच्या स्टेप्ससोबत चेहऱ्यावरील हावभावही लक्षवेधी असतात. आजच्या सोशल मीडिया युगात अनेक तरुण कलाकार रील्सच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवत आहेत. मात्र, नारकर दाम्पत्याने आपल्या सहजसुंदर अंदाजाने आणि सातत्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...