AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘RRR’ मध्ये अजय देवगन दमदार लूकमध्ये दिसणार, वाढदिवशी प्रेक्षकांना देणार रिटर्न गिफ्ट

राम चरण, ज्यूनियर एनटीआर आणि आलिया भटनंतर आता लवकरच अजय देवगनचा RRR या चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज केला जाणार आहे.

'RRR' मध्ये अजय देवगन दमदार लूकमध्ये दिसणार, वाढदिवशी प्रेक्षकांना देणार रिटर्न गिफ्ट
| Updated on: Mar 30, 2021 | 8:32 PM
Share

मुंबई : चित्रपट विश्वात सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती दिग्दर्शक एसएस राजामौलीच्या RRR या चित्रपटाची. या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडचा सिंघम अजय देवगन तेलगू डेब्यू करत आहे. अशावेळी एक मोठी बातमी समोर आली आहे आणि स्वत: अजय देवगननेच ती आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. राम चरण, ज्यूनियर एनटीआर आणि आलिया भटनंतर आता लवकरच अजय देवगनचा या चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज केला जाणार आहे.(Ajay Devgan’s first look in RRR movie will be released soon)

अजय देवगन आपल्या जन्मदिनी म्हणजे 2 एप्रिलला RRRमधील आपला फर्स्ट लूक रिलीज करुन चाहत्यांना रिटर्न गिफ्ट देणार आहे. हे एक मोशन पोस्टर असेल, ज्याला घेऊन स्वत: अजय देवगनही उत्साहित आहे. “RRR चित्रपटाचा हिस्सा बनून एक खूपच उत्साहित अनुभव मिळाला. मी तुम्हा सगळ्यांना हे सांगताना वाट पाहू शकत नाही की, एसएस राजामौलीने माझी भूमिका कशी रंगवली आहे”, अंस ट्वीट अजय देवगनने केलं आहे.

आलिया भटची तेलगू चित्रपटात एन्ट्री

अजय देवगन सोबत आलिया भटनेही या चित्रपटाच्या माध्यमातून तेलगू चित्रपटात एन्ट्री केलीय. काही दिवसांपूर्वी RRR चित्रपटाच्या निर्मात्यांनी आलिया भटचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केलं होतं. आलिया भटचा फर्स्ट लूकही तिच्या वाढदिवसाला म्हणजे 15 मार्च रोजी रिलीज केला होता. आलिया या चित्रपटात सीताची भूमिका बजावतेय.

RRR मधील स्टारकास्ट

आलिया भट RRRमध्ये राम चरणच्या आपोझिट भूमिका साकारत आहे. तर ज्यूनिअर एनटीआर ओलिवियासह रोमांस करताना दिसत आहेत. आलिया भट, अजय देवगण, राम चरण, आणि ज्यूनिअर एनटीआरसह या चित्रपटात समुथिरकानी, ओलिविया मॉरिस, एलिसर डूडी आणि रे स्टीवनसनही प्रमुख भूमिकेत आहेत.

इतर बातम्या :

Video | अमेरिकेच्या नेव्ही बँडने गायले ‘स्वदेस’ चित्रपटाचे गाणे, भावूक झालेल्या शाहरुखने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया!

Rashmika Mandanna | बिग बींसोबत स्क्रीन शेअर करणार ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदना, लवकरच चित्रीकरणाला होणार सुरुवात!

Ajay Devgan’s first look in RRR movie will be released soon

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.