‘या’ वेबसाईटवर ‘2.0’ सिनेमा लिक

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि अभिनेता अक्षय कुमार यांचा ‘2.0’ हा बहुप्रतीक्षित सिनेमाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भारतात तब्बल 33000 स्क्रीनवर प्रदर्शित झालेला ‘2.0’ सिनेमा मोठा धुमाकूळ घालत असतांनाच हा सिनेमा लिक झाला आहे. ‘2.0’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच काही तासांच्या आत तमिलरॉकर्स या वेबसाईटने लिक केला आहे. त्यामुळे ‘2.0’ च्या बॉक्स ऑफिसच्या गल्ल्यावर मोठा …

‘या’ वेबसाईटवर ‘2.0’ सिनेमा लिक

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि अभिनेता अक्षय कुमार यांचा ‘2.0’ हा बहुप्रतीक्षित सिनेमाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भारतात तब्बल 33000 स्क्रीनवर प्रदर्शित झालेला ‘2.0’ सिनेमा मोठा धुमाकूळ घालत असतांनाच हा सिनेमा लिक झाला आहे. ‘2.0’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच काही तासांच्या आत तमिलरॉकर्स या वेबसाईटने लिक केला आहे. त्यामुळे ‘2.0’ च्या बॉक्स ऑफिसच्या गल्ल्यावर मोठा परिणाम होईल. विशेष म्हणजे, तमिलरॉकर्स या वेबसाईटने अनधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून ‘2.0’ सिनेमा लिक करण्याची धमकी दिली होती. मात्र तमिलरॉकर्स याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी आम्ही कोणतेही ट्वीट केलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर ते ट्वीटर अकाऊंट बंद केलं आहे.

अनेक वेबसाईट्स ‘2.0’ हा सिनेमा डाऊनलोड केल्याचा दावा करत आहेत. ‘2.0’ ची ऑनलाईनवर HD प्रिंट उपलब्ध असल्याचं सांगितलं जात आहे. आता सिनेमाच्या निर्मात्यांकडून पायरेटेड कॉपी  रोखण्यासाठी 10 लोकांची टेक्निकल टीम काम करत आहे.

‘2.0’ सिनेमा रिलीज होण्याआधी लायका प्रोडक्शन हाऊसने सिनेमा पायरेटेड करणाऱ्या साईट्सवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यावर मद्रास हायकोर्टने 37 इंटरनेट सर्विस प्रोव्हाईडर यांच्यामार्फत 12000 पेक्षा अधिक वेबसाईट्स बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र तरी देखील 2.0 हा सिनेमा लिक झाला. वृत्तानुसार, तमिलरॉकर्सने ‘2.0’ हा सिनेमावर लिक केल्याचा आरोप आहे. मात्र, तमिलरॉकर्सने या वृत्ताचं खंडण केलं आहे.

सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्याकडून सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांनी चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, ‘2.0’ या सिनेमाने रिलीज होण्याआधीच 490 कोटींची कमाई केली आहे. या 490 कोटींमध्ये ‘2.0’ ने 120 कोटींची अॅडव्हान्स बुकिंग तर 370 कोटी रूपयांचे सॅटेलाईट राईट्स यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वी 2.0 ने सर्वाधिक कमाई केल्याचा विक्रम केला होता. या सिनेमाचे एकूण बजेट 500 कोटी रुपयांचं होतं.  पहिल्या दिवशी या चित्रपटाने तब्बल 100 कोटींची कमाई करत इतर सर्व मोठ-मोठ्या चित्रपटांना मागे टाकलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *