‘त्या’ अभिनेत्याला माजी महिला मुख्यमंत्र्यांना डेट करायचं होतं… ‘तो’ आजही अविवाहित

Love Life | करिश्मा कपूर हिच्यासोबत झालं असतं अभिनेत्याचं लग्न, पण माजी महिला मुख्यमंत्र्यांना डेट करण्याचे 'तो' पाहत होता स्वप्न... आजही आहे अविवाहित..., एका मुलाखतीत खुद्द अभिनेत्याने व्यक्त केली होती इच्छा.. कोण आहे 'तो'?

'त्या' अभिनेत्याला माजी महिला मुख्यमंत्र्यांना डेट करायचं होतं... 'तो' आजही अविवाहित
Follow us
| Updated on: Mar 29, 2024 | 2:46 PM

झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी मनात कोणतीही भीती न बाळगता मनातील इच्छा सर्वांसमोर व्यक्त केली आहे. बॉलिवूडच्या एक अभिनेत्याने तर थेट माजी महिला मुख्यमंत्र्यांना डेट करण्याची इच्छा एका मुलाखतीत व्यक्त केली होती. सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता अक्षय खन्ना आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अक्षय खन्ना याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. अक्षय खन्ना लग्न नाहीतर, लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहणं योग्य मानतो. दोन व्यक्तींना एकत्र राहण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज नाही… असं अभिनेत्याचं मत आहे.

दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय याने सिमी ग्रेवाल चॅट शोमध्ये स्वतःच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. मुलाखतीत अभिनेताने तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यासोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. अभिनेत्याचं वक्तव्य ऐकल्यानंतर सिमी ग्रेवाल यांना देखील मोठा धक्का बसला…

मुलाखतीत सिमी यांनी अभिनेत्याला कोणाला डेट करायला आवडेल असा प्रश्न विचारला होता. यावर अभिनेता म्हणाला होता, ‘मी जयललिता यांना डेट करेल. त्या मला आकर्षित करतात.’ असं म्हणाला होता. अभिनेत्याचं उत्तर ऐकून होस्ट सिमी देखील थक्क झाल्या होत्या. या गोष्टीला अनेक वर्ष झाली आहेत, पण तरी देखील अभिनेत्याबद्दल चर्चा रंगत असतात.

हे सुद्धा वाचा

अक्षय खन्ना कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. एककाळ असा होता जेव्हा अक्षय खन्ना आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या नात्याची चर्चा रंगली होती. दोघांचं नातं लग्ना पर्यंत देखील पोहोचलं होतं. करिश्मा हिचे वडील रणधीर कपूर यांची इच्छा होती ती अक्षय खन्न कपूर कुटुंबाचा जावई व्हायला हवा…

रणधीर कपूर लेकीचं स्थळ घेऊन अक्षय खन्ना याच्या घरी गेले होते. तेव्हा अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये नुकताच पदार्पण केलं होतं. तर करिश्मा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी होती. करिश्मा – अक्षय यांच्या नात्याला अभिनेत्रीच्या आईचा विरोध होता. त्यानंतर अक्षयने कधीच लग्नाचा विचार केला नाही. आजही अभिनेता अविवाहित आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.